आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चीन अन् अमेरिकेमुळे भारताची जोखीम वाढली, आर्थिक सुधारणा आवश्यक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- भारताची अर्थव्यवस्था देशांतर्गत बाबतीत चांगली मजबूत असली तरी नुकतेच भारतीय अर्थव्यवस्थेला बाहेरील झटक्यांचा सामना करावा लागला. यात विशेष करून अमेरिकी फेडरल रिझर्व्हच्या वतीने व्याजदरात वाढ करण्यात आली आणि चीनमध्ये आलेल्या अार्थिक मंदीमुळे भारताच्या समोर अडचणी उभ्या राहिल्या. गेल्या एका वर्षात यामुळेच अडचणी वाढल्या आहेत.

एका सर्वेक्षणानंतर मुडिजच्या गुंतवणूक सेवा देणाऱ्या विभागाने हा निष्कर्ष काढला आहे. या सर्वेक्षणात एजन्सीच्या वतीने ११० बाजारातील व्यक्तींची मते विचारण्यात आली होती. यात भारतातील काही मोठे गुंतवणूकदार आणि ब्रोकर यांचा देखील समावेश होता. भारताची अर्थव्यवस्था ६.७ ते ७.५ टक्क्यांच्या गतीने वाढू शकते, असे मत ७५ टक्के सहभागी नागरिकांनी व्यक्त केले. सध्याच्या स्थितीत इतर विकसनशील देशांच्या तुलनेत भारतीय अर्थव्यवस्था तेजीने विकास करेल हे मात्र सर्वांनी एकमताने मान्य केले. मुडिज गुंतवणूक सेवेच्या वतीने हा सर्व्हे याच महिन्याच्या सुरुवातीला करण्यात आला होता.

सरकारने महत्त्वाच्या आर्थिक सुधारणांच्या दिशेने निर्णय घेणे आवश्यक असल्याचेे मत या सर्व्हेच्या अहवालात व्यक्त करण्यात आले आहे. बिझनेससाठी वातावरण सुधारण्यासाठी आणि गुंतवणुकीच्या नियमात सरकारच्या वतीने काम करण्यात आले असले तरी जीएसटी आणि भूसंपादनासारख्या महत्त्वपूर्ण विधेयकावर सुस्ती कायम आहे. खासगी गुंतवणूक वाढवण्यासाठी हे विधेयक मंजूर होणे आवश्यक आहे.
पुढील स्लाइड्सवर जाणून घ्या, इतर विकसनशील देशांच्या तुलनेत भारत...