आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Economy Is Moving But Need More Speed, Says Raghuram Rajan

अर्थव्यवस्थेला वेग, पण सुधारणा आवश्यक; रघुराम राजन यांचे मत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - अर्थव्यवस्थेत सुधारणा हाेत असल्याबद्दल अात्मविश्वास व्यक्त करतानाच रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी भांडवली गुंतवणुकीचे प्रमाण वाढत असले तरी त्यात अाणखी भक्कम वाढ हाेण्यासाठी अधिकाधिक सुधारणा अाणि रखडलेल्या प्रकल्पांमधील अडथळे दूर करण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले.

जागतिक घडामाेडींमुळे निर्यात मंदावलेली असून ते चिंतेचे कारण अाहे; पण अर्थव्यवस्थेला वेग येत असून भांडवली गुंतवणुकीत झालेल्या वाढीतून त्याचे काही संकेत मिळत अाहेत. पण त्यातील सातत्य कायम राहण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. रखडलेल्या प्रकल्पांना पुन्हा रुळावर अाणून सरकारही त्या दृष्टीने प्रयत्न करत असल्याचे राजन यांनी सांिगतले. िरझर्व्ह बँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीनंतर ते पत्रकारांशी बाेलत हाेते.

महागाई हा नेहमीच चिंतेचा विषय
महागाई अाणि त्याच्या रिझर्व्ह बँकेच्या धाेरणात्मक भूमिकेवर हाेणाऱ्या परिणामाबद्दल बाेलताना राजन म्हणाले की, महागाई हा नेहमीच चिंतेचा विषय असताे. माॅन्सूनच्या बाबतीत मात्र सध्या तरी चांगली बातमी अाहे, पण त्यावरही लक्ष ठेवून अाहाेत.

चिरस्थायी अार्थिक वाढ गरजेची
भारतीय अर्थव्यवस्थेत स्थिर सुधारणा हाेण्याची प्रक्रिया सुरू झाली अाहे. अर्थात ही वाढ जलदगतीने व्हावी, असे अापल्याला वाटणे साहजिक अाहे; पण त्यासाठी अडथळे दूर करण्याच्या दृष्टीने काम करणे अाणि सुधारणा घडवून अाणणे गरजेचे अाहे, तरच भक्कम अाणि चिरस्थायी अार्थिक वाढ हाेऊ शकेल याकडे त्यांनी लक्ष वेधले.