आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मल्ल्यांची १४११ कोटींची मालमत्ता ईडीकडून जप्त, आयडीबीआयचे ९०० कोटींचे कर्ज बुडवले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - आयडीबीआय बँकेचे कर्ज थकवल्याच्या प्रकरणात सक्तवसुली संचालनालयाने शनिवारी मद्यसम्राट विजय मल्ल्या यांच्या मालकीची सुमारे १,४११ कोटी रुपयांची मालमत्ता ताब्यात घेतली आहे.मनी लाँडरिंग कायद्यान्वये मल्ल्या आणि यूबी लिमिटेड कंपनीची मालमत्ता ताब्यात घेतल्याची माहिती ईडीच्या अधिकाऱ्याने दिली. मल्ल्या यांनी आयडीबीआय बँकेचे ९०० कोटी रुपयांचे कर्ज बुडवल्याच्या प्रकरणात ही कारवाई करण्यात आली.

विविध बँकांचे सुमारे ९ हजार कोटी रुपये थकवल्यानंतर मल्ल्यांच्या मालकीच्या किंगफिशर एअरलाइन्सचे दिवाळे निघाले होते. यानंतर २ मार्च २०१६ रोजी मल्ल्यांनी परदेशात पळ काढला होता. गतवर्षी सीबीआयच्या एफआयआरवरून ईडीने मल्ल्यांविरुद्ध मनी लाँडरिंगचा गुन्हा दाखल केला होता.

अशी मालमत्ता
>३४ कोटींचा बँक बॅलन्स
>मुंबईत १,३०० चौरस फूट तर बंगळुरूतील २,२९१ चौरस फुटांचा फ्लॅट
>चेन्नईत ४.५ एकरांचा औद्योगिक भूखंड
>कूर्गमध्ये २८.७५ एकरांचा कॉफी मळा
>यूबी सिटी, किंगफिशर टॉवरमधील ८ लाख ४०,२७९ चौ.फू. निवासी व व्यावसायिक मालमत्ता
बातम्या आणखी आहेत...