आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ekta Bhargav Selected In Apple With Crore Package

EX मेयरच्या नातीला Apple ने दिले एक कोटी रुपयांचे सॅलरी पॅकेज

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ग्वाल्हेर- जगातील सर्वात मोठी मोबाइल कंपनी Appleने ग्वाल्हेर येथील रहिवासी एकताला सुमारे एक कोटी रुपयांचे सॅलरी पॅकेज दिले आहे. चीनमधील मोबाइल प्रॉडक्शन युनिटमध्ये 'बिझनेस ऑपरेशन मॅनेजर' या पदावर एकता काम करणार आहे. एकता सध्या कॅलिफोर्नियातील ऑफीसमध्ये असून ती लवकरच चीनला रवाना होणार आहे.

ग्वॉल्हेरचे माजी महापौर भारत भूषण भार्गव यांची ती नात आहे. इंदिरा नूई, चंदा कोचर व किरण मजूमदार शॉ यांच्या सारखे नाव उज्ज्वल करायचे असल्याचे एकताने म्हटले आहे.
एकताने येथील सिंधिया गर्ल्स स्कूलमध्ये माध्यमिक शिक्षण घेतल्यानंतर पुण्यातील कमिंस कॉलेजात बीई केले. नंतर एकेईआर सोल्युशन्समध्ये तिने काम सुरु केले. एमटेकसाठी न्यूयॉर्क येथील 'युनिव्हर्सिटी ऑफ बफेलो'मध्ये तिची निवड झाली. एमटेक पूर्ण होताच तिला Apple कंपनीने बिझनेस ऑपरेशन मॅनेजर पदाची ऑफर दिली.


जगातील दिग्गज कंपनी Appleमध्ये काम करण्याचे माझे स्वप्न होते. ते आता पूर्ण झाल्याचे एकताने सांगितले. मुलीवर अभिमान असल्याचे एकताचे वडील पीयूष भार्गव यांनी म्हटले आहे.
पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा, एकता भार्गवचे फोटो....