आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अल निनोचा धोका कायम, महागाई वाढवणार : नोमुरा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - भारताला यंदा अल निनोचा धोका असून त्यामुळे पाऊसमान कमी होण्याची शक्यता असल्याचा अंदाज नोमुरा या जपानच्या ब्रोकरेज कंपनीने वर्तवला आहे. यामुळे देशाच्या ग्रामीण भागातील मागणी होण्याची तसेच अन्नधान्याची महागाई वाढण्याची शक्यता असल्याचे नोमुराने म्हटले आहे.

नोमुराच्या मते, यंदा अल निनो स्थिती उदभवण्याची शक्यता आहे. त्यामुळे भारतातील खाद्य पदार्थांची महागाई वाढण्याची शक्यता आहे. अल निनो स्थितीमुळे नेहमीच पाऊस कमी पडतो असे नाही मात्र त्यामुळे पावसाळ्यात (जून ते स्पटेंबर) अनियमित पाऊसमानाचा धोका उद्भवतो. ऑस्ट्रेलियाचा हवामानविषयक साऊथर्न ऑसिलेशन इंडेक्स फेब्रुवारीतील ०.६ वरून मार्चमध्ये (-) ११.२ पर्यंत घसरला आहे. हा इंडेक्स (-) ८ च्या खाली असणे अल निनो स्थितीचे निदर्शक असते. या हवामान खात्याच्या मते यंदा अल निनोची शक्यता आता ७० टक्के उद्भवणार या पातळीत आली आहे. यापूर्वी अल निनो ५० टक्के उद्भवणार, असा अंदाज वर्तवला होता.

शेतीवर परिणाम
अल निनोची स्थिती आल्यास भारतात सलग तिसऱ्या वर्षी कृषी हंगामावर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील उत्पन्नावर परिणाम होऊन अन्नधान्याची महागाई वाढण्याची शक्यता आहे. यामुळे सरकारने किमान हमी भावात वाढ करण्याची मागणी भारतात जोर धरत असल्याचे अर्थतज्ज्ञ सोनल वर्मा म्हणाल्या.