आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Elizabeth Holmes\' Billion dollar Success Story May Be Reaching Bloody End

शिक्षण सोडून तिने काढली कंपनी, 32 व्या वर्षी झाली अब्जाधीश, वाचा यशकथा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एलिझाबेथ होम्स - Divya Marathi
एलिझाबेथ होम्स
लॉस एंजलिस - एलिझाबेथ होम्सचे वय सध्या अवघे १९ वर्षे आहे. मात्र, ती जगातील सर्वांत कमी वयाची आणि स्वयंपूर्ण अब्जाधीश महिला आहे. शिक्षणात तिचे मन रमत नव्हते म्हणून तिने शिक्षणच सोडून दिले. १९ व्या वर्षी आपल्याकडील बचतीच्या पैशातून कंपनी काढली. तिला लहानपणी इंजेक्शनची भीती वाटे. मग तिने ठरवले, पेनलेस अर्थात वेदना न होणारे इंजेक्शनच का तयार करू नये? यानंतर तिने जिद्दीने आरोग्य क्षेत्रात यशस्वी पाऊल ठेवले. नंतरच्या काळात लोकांना सोपे व स्वस्त रक्त तपासणी किट पुरवणे सुरू केले. आज होम्स ४ अब्ज ५० कोटी रुपयांची मालकिन आहे.

थेरासॉन या होम्सच्या कंपनीने काही दिवसांतच अमेरिकेतील आरोग्य क्षेत्रांत अक्षरश: क्रांती घडवली आहे. तीन वर्षांपूर्वी तिने वॉलग्रीन कंपनीसोबत करार केला. आज या कंपनीचे निम्मे शेअर होम्सकडे आहेत. या दोन्ही कंपन्यांचे भागभांडवल आज चक्क ९ अब्ज रुपयांहून अधिक आहे. विशेष म्हणजे ही सर्व संपत्ती होम्सच्या कष्टाची आहे. लवकरच होम्सची कंपनी भारतात उतरत आहे. होम्स सांगते, मला स्वत:हून एखाद्या कामात गुंतवून घ्यावयाचे होते म्हणून ही कंपनी सुरू केली. लहान असताना आई-वडिल मला डॉक्टरकडे नेत. तेव्हा इंजेक्शनची खूप भीती वाटे. मला वाटे, वेदना होणार नाहीत असे इंजेक्शन असते तर? मोठी झाल्यावर याच आठवणी मनात कायम होत्या.

मी कंपनी उभारली तेव्हा याच कल्पनेवर प्रथम विचार केला. पेनलेस इंजेक्शनचे सूत्र शोधून काढले. एखाद्या शरीरात इंजेक्शन देऊन त्याचे रक्त काढणे म्हणजे एकप्रकारे त्रास देणेच आहे.
थेरानॉस रक्त तपासणीत नॅनोटेनर तंत्रज्ञानाचा वापर करते. यात रक्त घेण्यासाठी अत्यंत सूक्ष्म सुईचा वापर केला जातो. यात नसांमधून रक्त घेण्याऐवज बोटांच्या टोकावरून रक्त घेतले जाते. साधारणपणे रक्त तपासणीसाठी जेवढे रक्त घेतले जाते, ते शरिरातील रक्ताच्या शंभराव्या भागाइतके असते. एका नमुन्यातून ३० चाचण्या घेतल्या जाऊ शकतात. यात १०० हून अधिक आजार व लक्षणांची तपासणी होऊ शकते. नवजात मुलांसाठी तर हे तंत्र खूपच उपयोगी ठरणारे आहे.
पुढील स्‍लाइड्सवर पाहा, एलिझाबेथ होम्सचे फोटोज...