आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जानेवारी ते मार्च २०१६ दरम्यान देशात रोजगार संधी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - वर्ष २०१६ च्या पहिल्या तीन महिन्यांत मोठ्या कंपन्या रोजगाराच्या चांगल्या संधी देतील. जानेवारी ते मार्च दरम्यानच्या तिमाहीमध्ये कंपन्यांच्या भरती योजनांच्या अनुषंगाने भारत ४२ देशांतील सर्वात जास्त आशावादी िदसत असल्याचा दावा मॅनपाॅवर ग्रुपच्या वतीने तिमाही रोजगार सर्वेक्षणात करण्यात आला आहे. या सर्व्हेनुसार कंपन्या जास्त भरती उत्तर आणि पश्चिम क्षेत्रात करतील.

देशभरात ५,०६५ कंपन्यांमध्ये करण्यात आलेल्या या सर्व्हेमध्ये ४२ टक्के कंपन्यांनी २०१६ च्या पहिल्या तिमाहीत आपले कर्मचारी वाढवणार असल्याचे सांगितले आहे. ई-कॉमर्समध्ये आलेल्या तेजीमुळे विक्रीत वाढ होण्याची शक्यता असून पुढील काळातही यात वाढ होणार असल्याचा अंदाज या कंपन्यांच्या वतीने व्यक्त करण्यात आला आहे.
भारतीय अर्थव्यवस्था सलग विकासाच्या रस्त्यावर पुढे जात असल्याचे मत मॅनपाॅवर समूहाचे भारतातील एमडी ए. जी. राव यांनी व्यक्त केले. भारतावरील विश्वास मजबूत होत असून त्यामुळे गुंतवणूक वाढत असल्याचे ते म्हणाले. त्यामुळे पहिल्या तीन महिन्यांत देशातील रोजगाराच्या संधींत सकारात्मकता दिसून येत आहे. यामध्ये दळणवळण, युटिलिटीज, ठोक आणि किरकोळ व्यवहार, फायनान्स, विमा, रिअल इस्टेट, लोकप्रशासन आणि शिक्षण क्षेत्रात मोठ्या प्रमाणात संधी असल्याचे त्यांनी सांगितले.
४२ देशांत सर्वेक्षण
मॅनपाॅवर समूहाच्या वतीने करण्यात अालेल्या या सर्व्हेमध्ये ४२ देशांतील ५८,००० कंपन्यांची मते समजावून घेण्यात आली आहेत. या सर्वेक्षणानुसार रोजगाराच्या संधींत वाढ होणाऱ्या देशांमध्ये भारतानंतर तैवान (२९ टक्के), जपान (२३ टक्के), तुर्की (१९ टक्के) आणि अमेरिका (१७ टक्के) यांचा क्रमांक लागतो.
बातम्या आणखी आहेत...