आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शाहरुखला ED ची नोटीस, केकेआरचे शेअर्स कमी किमतीत ट्रान्सफर केल्याचा आरोप

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - अंमलबजावणी संचलनालयाने (ईडी) परकीय चलन नियमांत उल्लंघनाच्या एका प्रकरणात आयपीएलमधील कोलकाता नाईट रायडर्स टीमचा मालक शाहरुख खानला नोटस पाठवली आहे. या नोटीस मध्ये शाहरूख खानला त्याची बाजू विचारण्यात आली आहे. त्याला या महिन्याच्या अखेरीपर्यंत स्वतः हजर राहून याबाबत उत्तर द्यावे लागणार आहे. केकेआरच्या तथाकथिक अंडर व्हॅल्युएशनवर ही नोटीस पाठवण्यात आली आहे. शाहरूख खानच्या कंपनीने शेअर्स ट्रान्सफर कऱण्यासाठी कमी किंमत सांगितली होती. याच प्रकरणात चार वर्षांपूर्वी 2011 मध्येही ईडीने शाहरुखला नोटीस पाठवली होती.

100 कोटींच्या परकीय चलन उल्लंघनाचे प्रकरण
यासंदर्भात मिळालेल्या माहितीनुसार, ईडीने ज्या प्रकरणामध्ये शाहरुख खानला नोटीस पाठवली आहे ते प्रकरण 100 कोटींच्या फॉरेक्स नियम उल्लंघनाशी संबंधित आहे. ईडीसाठी चौकसी अँड चौकसीने केलेल्या ऑडिटमध्ये परकीय चलन नियमांचे उल्लंघन केल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. कोलकाता नाइट रायडर्स स्पोर्ट्स प्राइव्हेट लिमिटेड आणि जय मेहता यांचा मालकी हक्क असलेली कंपनी सी आइसलँड इनव्हेस्टमेंट यांच्यात झालेल्या शेअर ट्रान्सफरमध्ये या नियमाचे उल्लंघन झाल्याचे म्हटले आहे. जय मेहता अभिनेत्री जुही चावला हिचा नवरा आणि केकेआरमध्ये कोओनरही आहे.