आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ईपीएफ आणि एनपीएस दोनपैकी चांगला पर्याय कोणता?

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सेबीचे नोंदणीकृत गुंतवणूक सल्लागार, फायनान्शियल गिल्ड ऑफ इंडियाचे सदस्य.
ईपीएफ आणि एनपीएस म्हणजे भविष्य निधी आणि नॅशनल पेन्शन स्कीममधून कोणता निवडावा? आता हा चिंतनाचा विषय आहे. कारण गुंतवणूकदारांना कोणता पर्याय चांगला राहील, याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. ईपीएफ एक सुरक्षित गुंतवणूक किंवा अंशदान आहे. याचे सातत्याने चक्रवाढ दराने व्याज मिळते. जेव्हा एनपीएस एक वेगळ्या प्रकारची सुविधा आहे. यात परतावा जास्त आहे. ईपीएफ आणि एनपीएसमध्ये टॅक्स लागतो. जाणून घ्या चांगला पर्याय कोणता?
२०१५-१६ च्या अर्थसंकल्पात ईपीएफ किंवा नवी पेन्शन स्कीम दोहोपैकी कोणताही एक पर्याय नागरिक निवडू शकतात. तरी ईपीएफओकडून यास विरोध दर्शवण्यात आलेला नाही. यामुळे गुंतवणूकदारांमध्ये ईपीएफ निवडावा की एनपीएसचा पर्याय निवडावा; कोणता पर्याय योग्य यावरून द्विधा मन:स्थिती आहे. तरीही दोन्ही पर्याय दीर्घकाळ फायदा देणारे आहेत ही एक बाब दोहोंमध्ये समान आहे. यासाठी दोन्ही पर्याय समजून घेतले पाहिजेत.

एनपीएस (नवी पेन्शन स्कीम)
यात रक्कम जमा केल्यानंतर निवृत्तीपर्यंत चांगला पैसा जमा होतो. या योजनेत किती रक्कम जमा करावी हे तुम्हालाच ठरवावे लागणार आहेत. यात इक्विटी डेबिटमध्ये गुंतवणूक करता येते. तुम्हाला ठरवायचे असते की, गुंतवणूक कोठे करायची आहे. जास्तीत जास्त ५० टक्क्यांपर्यंत गुंतवणूक इक्विटीमध्ये आणि बाकी गिल्ट किंवा काॅर्पोरेट बाँडमध्ये टाकता येते. तुम्ही किती जोखीम घेऊ इच्छिता यावर ते सर्व अवलंबून आहे. याशिवाय अॉटो अलोकेशनची सुविधा आहे. यात तुमच्या वाढत्या वयाबरोबर इक्विटीमध्ये गुंतवणूक कमी होते. अॅसेट अलोकेशनमध्ये ज्यांना फारसे कळत नाही, अशांसाठी ही गुंतवणूक योग्य ठरते. ६ फंड मॅनेजर एनपीएसच्या ठेवी संकलनाचे काम पाहतात. यापैकी एकाची तुम्हाला निवड करायची असते. तुम्ही फंड मॅनेजर बदलूही शकता.

ईपीएफ
कर्मचारी भविष्य निर्वाह निधीमध्ये कर्मचाऱ्यांचे अंशदान जमा केले जाते. हा सुद्धा दीर्घकाळासाठी आहे. यात मूळ पगाराचा एक भाग अंशदान म्हणून जमा केले जाते. जितकी रक्कम कर्मचाऱ्यांची असते तेवढीच नियोक्त्याची भरली जाते. यात जी गुंतवणूक सरकारी रोख्यात केली जाते, त्यावरचे व्याज तुम्हाला मिळते. हे व्याज पूर्ण अंशदानावर असते. याचे व्याज किंवा फायदा ईपीएफओद्वारे दरवर्षी दिला जातो. एकदा घोषणा केल्यानंतर त्यात तो वाढत नाही.

फरक कोणता?
दोन्ही योजनांत खूप फरक आहे. यामुळे दोन्हीची तुलना होते. ईपीएफमध्ये एका ठरावीक दराप्रमाणे व्याज मिळण्याची शक्यता आहे. जर व्याजदर घटत किंवा वाढत चालले तर गुंतवणूकदारास अडचण निर्माण होते. यात असलेला फरक अशा प्रकारे

अंशदान -
ईपीएफमध्ये अंशदान मूळ पगाराच्या अाधारावर ठरवले जाते. जर यात जास्त रक्कम भरावी असे तुम्हाला वाटले तर तुम्हाला स्वेच्छिक प्राव्हिडंट फंडाचा पर्याय निवडावा लागेल; परंतु ईपीएफ प्रत्येकासाठी खुला नाही. नव्या पेन्शन योजनेत तसे नाही. कोणतीही व्यक्ती एनपीएसचे खाते आजच सुरू करू शकतो. यात ईपीएफसारखीच गुंतवणूक करता येते. पगाराचा काही भाग यात जमा करता येईल; परंतु तुमचे अंशदान तुम्ही स्वत: ठरवायचे आहे.

गुंतवणूक
दोहोमध्ये खूप फरक आहे. कारण गुंतवणुकीची पद्धत वेगळी आहे. ईपीएफची रक्कम पूर्णपणे सरकारी रोख्यांतच भरली जाते. सरकारने याआधीच नियमात बदल करून ५ ते १० टक्के रक्कम इक्विटी मार्केटमध्ये गुंतवण्याची अनुमती दिली आहे. ईपीएफओला आता परतव्यात होणाऱ्या घट आणि वाढीचा निर्णय घ्यावा लागतो. याउलट एनपीएस म्युच्युअल फंडाप्रमाणे मार्केटवर अवलंबून असलेले प्रॉडक्ट आहे. यात जी गुंतवणूक होते, ती इक्विटी, शासकीय सुरक्षा योजना किंवा काॅर्पोरेट बाँड्समध्ये केली जाते. यात तुम्ही एक गुंतवणूकदार म्हणून कोणत्या वस्तूवर किती रक्कम गुंतवायची हे ठरवू शकता.

परतावा
ईपीएफमध्ये परतावा ठरलेला असतो. तो व्याजाच्या रूपाने मिळतो. ही रक्कम चक्रवाढ व्याजदराने असते. दरवर्षी याचे व्याज ईपीएफओद्वारे ठरवले जाते. एनपीएसमध्ये असे होत नाही. यात असेट अलोकेशन वेगवेगळ्या वस्तूंच्या खरेदीच्या बळावर परतावा मिळतो. यासाठी जसा परतावा तशा प्रकारची गुंतवणूक करावी लागते.

कर किती लागेल
येथे ईपीएफ एनपीएसपेक्षा जास्त फायदेशीर आहे. भविष्य निर्वाह निधीमध्ये मिळणारे व्याज करमुक्त असते. तुम्हाला पाच वर्षांनंतर रक्कम काढता येते. यात कोणताही कर लागत नाही. अशा प्रकारे चक्रवाढ व्याज, तेसुद्धा महागाई दरापेक्षा जास्त दराने आणि त्यावर व्याज न लागणे हा पर्याय गुंतवणुकीच्या दृष्टीने चांगला पर्याय आहे. याउलट एनपीएसमध्ये करकपात होते. यामुळे ईपीएफ गुंतवणूकदारास जास्त सोयीचा वाटेल. एनपीएसमध्ये जास्तीचा परतावा असला तरी करही लागतो, हेही तितकेच खरे!

लिक्विडिटी
याशिवाय ईपीएफमध्ये खूप लिक्विडिटी हे एक वैशिष्ट्य आहे, पाच वर्षे सातत्याने रक्कम भरल्यानंतर कोणत्याही वेळी तो काढता येतो. तेही करमुक्त असते. जे सतत नोकरी बदलत असतात आणि रक्कम ट्रान्सफर करू इच्छित नाहीत, अशांसाठी हा पर्याय चांगला आहे. तसे एनपीएसच्या बाबतीत घडत नाही. यात पैसे काढण्यासाठी एक खिडकी आहे. मात्र, मर्यादित रक्कम काढता येते. पूर्ण रक्कम काढता येत नाही. यामुळे ईपीएफ चांगली योजना म्हटली जाते. काहींना वाटते, एनपीएसमध्ये रक्कम सहज मिळते, पण तसे काही नाही.
जर तुम्ही मिळालेल्या माहितीवर सखोल विचार केला तर ईपीएफ केव्हाही चांगला पर्याय आहे. काेणाला निवड करण्यास सांगितले तर ईपीएफची निवड करेल; परंतु ईपीएफचा वापर निवृत्तीनंतरच्या सोयीसाठी न करता बरेच जण गरज भागवण्यासाठी करतात.