आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आता या 5 स्टेप्सद्वारे स्वतःच जनरेट करा स्वतःचा UAN, EPFO ने सुरू केली नवीन सेवा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (Employees' Provident Fund Organisation किंवा EPFO) ने एख नवीन सेवा सुरू केली आहे. त्याअंतर्गत आता सदस्याला स्वतःच UAN जनरेट करता येणार आहे. पण त्यासाठी मोबाईल क्रमांक आधारशी लिंक असणे गरजेचे असेल. तसे नसेल तर UAN जनरेट केला जाणार नाही. नवीन जॉब जॉइन केल्यास तुम्ही स्वतः कंपनीला हा क्रमांक देऊ शकता. 


UAN कसा करायचा जनरेट? 
यासाठी पाच स्टेप्स गरजेच्या असतील. ही प्रोसेस पूर्ण केल्यानंतर तुमच्याकडे तुमचा युनिव्हर्सल अकाऊंट क्रमांक म्हणजे UAN येईल.  


1. सर्वात आधी https://unifiedportal-mem.epfindia.gov.in/memberinterface/ लिंकद्वारे ईपीएफओच्या मेंबर पोर्टलवर जा. येथे डायरेक्ट UAN अलॉटमेंटवर क्लिक करा. 

2. क्लिक केल्यानंतर समोर जी स्क्रीन येईल, त्यात तुम्हाला तुमचा आधार क्रमांक टाकावा लागेल. त्यानंतर जनरेट ओटीरी (वन टाइप पासवर्ड) वर क्लिक करा. ओटीपी तुमच्या रजिस्टर्ड क्रमांकावर येईल. 

3.ओटीपी एंटर केल्यानंतर आणि डिस्क्लेमर अॅक्सेप्ट केल्यानंतर तुम्हाला सबमिट बटन दिसेल. पुढे जाण्यासाठी सबमिट बटन क्लिक करा. 

4. सबमिट बटन क्लिक केल्यानंतर तुमच्या आधारद्वारे जे डिटेल्स फीड केलेले आहेत ते स्क्रीनवर दिसतील. तुमचे नाव, पत्ता, जन्मदिनांक अशा माहितीचा त्यात समावेश असेल. हा डाटा व्हेरीफाय करून तुम्ही स्क्रीनवर मागितलेली इतर डिटेल देऊ शकता. त्यानंतर कॅप्चा एंटर केल्यानंतर आणि डिस्क्लेमर एक्सेप्ट केल्यानंतर तुम्ही रजिस्टर बटनवर क्लिक करा. 

5. रजिस्टार बटनवर क्लिक करताच तुम्हाला UAN अलॉट होईल. त्याचा मॅसेज स्क्रीनवर दिसेल. 


ईपीएफओने का उचलले हे पाऊल 
- सध्या पीएफ कॉन्ट्रीब्युशनसाठी UAN गरजेचे आहे. सध्या फक्त एम्प्लॉयरच एम्प्लॉइचे यूएएन जनरेट करू शकते. 
- कंपन्या प्रत्येक महिन्याला अनेक एम्प्लॉइ जॉइन करतात. त्यावेळी कंपन्यांना यूएएन जनरेट करण्यात अडचणी येतात. कारण त्यांचा डाटा आधारच्या डाटाशी मॅच होत नाही. कंपन्यांच्या अडचणी लक्षात घेत ईपीएफओने युनिफाइड पोर्टलवर डायरेक्ट यूएएन अलॉट करण्याची सेवा सुरू केली आहे. 

 

बातम्या आणखी आहेत...