आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पीएफवरील व्याजदराचा निर्णय जानेवारीत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - ईपीएफओच्या वतीने चालू आर्थिक वर्ष २०१५-१६ साठीच्या पीएफवरील व्याजदराबाबतचा निर्णय जानेवारीमध्ये होणाऱ्या बैठकीत निश्चित करण्यात येणार आहे. ईपीएफओचे निर्णय घेणारी संस्था सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टीजची (सीबीटी) पुढील बैठक जानेवारीमध्ये होणार आहे. गेल्या दोन वर्षांपासून पीएफवर ८.७५ टक्के व्याजदर मिळत आहे. चालू आर्थिक वर्षात यामध्ये वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सीबीटीची बुधवारी बैठक झाली. या बैठकीतच हा निर्णय होणार असल्याचे सांगण्यात येत होते. मात्र, आता जानेवारीमध्ये होणाऱ्या बैठकीत यावर िनर्णय होणार असल्याचे कामगारमंत्री बंडारू दत्तात्रेय यांनी बुधवारच्या बैठकीनंतर सांगितले.