आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पीएफवर ८.७५ टक्क्यांपेक्षा जास्त व्याजदर मिळणार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - कर्मचारी भविष्य निर्वाह संघटना यंदा भविष्य निर्वाह निधीवर (पीएफ) ८.७५ टक्क्यांपेक्षा जास्त व्याजदर देण्याची शक्यता आहे. मागील दोन आर्थिक वर्षांपासून पीएफवर ८.७५ टक्के व्याज मिळते, यंदासाठी व्याजदर ठरवण्यासाठी विश्वस्त मंडळाची बैठक बुधवारी (दि. ९) होणार आहे. त्यात व्याजदराबाबत अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या (ईपीएफओ) केंद्रीय विश्वस्त मंडळाची बैठक बुधवारी होणार आहे. पीएफवरील व्याजदर ठरवण्याचा मुद्दा बैठकीच्या वृत्तात नसला, तरी यावर निर्णय होण्याची शक्यता आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह संघटनेची फेररचना करण्यासाठी मुख्यत: ही बैठक आयोजित करण्यात आली आहे. मात्र, संघटना सध्या किती उत्पन्न मिळेल यावर काम करते आहे, तेव्हा व्याजदराची निश्चिती करणे आवश्यक ठरणार आहे. संघटनेने २०१३ -१४ आणि २०१४-१५ या आर्थिक वर्षांसाठी भविष्य निर्वाह निधीवर ८.७५ टक्के व्याज दिले आहे. चालू आर्थिक वर्षात (२०१५-१६) संघटनेचा ८.७५ टक्क्यांपेक्षा जास्त व्याजदर देण्याचा मानस आहे.
मंत्रालयाचा आग्रह
संघटनेने पीएफवर जास्त व्याजदर देण्यावर भर दिलेला असताना वित्त मंत्रालय मात्र चालू आर्थिक वर्षात संघटनेने पीएफवर ८.७५ टक्के व्याज द्यावे, यावर ठाम आहे. असे असले तरी विश्वस्त मंडळाने ठरवले तर जास्त व्याज मिळण्याची शक्यता अधिक आहे. कारण संघटना आपल्या उत्पन्नातून व्याज अदा करते.
बातम्या आणखी आहेत...