नवी दिल्ली - आयएएस अधिकारी होऊन समाजसेवेचे स्वप्न या तरुणीने बघितले होते. मात्र, वडिलांच्या किराणा व्यवसायात आलेल्या तोट्यामुळे १२वीत असतांनाच हे स्वप्न धुळीस मिळाले. शिक्षण घेत असतांना कुटूंबाला आर्थिक हातभार लावणे सुरु केले. यातून तिला काहीतरी करण्याची प्रेरणा मिळाली. पुरुषांची मक्तेदारी असलेल्या किराणा व्यवसायात तिने स्वत:ची एक नवी ओळख निमार्ण केली. आज हिच तरुणी ६० कोटी उलाढाल असलेला व्यवसाय खंबीरपणे सांभाळतेय. होय, या तरुणीचे नाव आहे लक्ष्मी फूड्सची संचालिका दिपाली सिंह....
'दिव्य मराठी डॉट कॉम'शी बोलतांना दिपाली सिंह म्हणाली, की सुरवातीला कमी भांडवलात गहू खरेदी-विक्रीचा व्यवसाय सुरु केला. पाहता-पाहता हा व्यवसाय अवघ्या दोन वर्षात ६० कोटी रुपयांच्या घरात पोचला. हे यश गाठतांना काही दिवस एका फूड कंपनीत नोकरीसुद्धा केली.
पुढे वाचा... दिपाली सिंह अशा प्रकारे मिळविले व्यवसायात यश