आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ग्रीसला तिसर्‍यांदा बेलआऊट पॅकेज, युरोझोनच्या नेत्यांच्या बैठकीत निर्णय

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ब्रुसेल्स- कर्जबाजारीपणामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या ग्रीसला तिसर्‍यांदा दिलासा मिळाला आहे. ग्रीसला कर्ज (बेलआऊट पॅकेज) देण्यावर युरोझोनमधील नेत्यांमध्ये एकमत झाले आहे. युरोपियन परिषदेचे अध्यक्ष डोनाल्ड टस्क यांनी 'ट्विटर'द्वारे ही माहिती दिली आहे.

ग्रीसला बेलआऊट पॅकेजचे वृत्त समजताच युरोपिय शेअर बाजारात तेजी दिसून आली आहे. त्याचप्रमाणे भारतीय शेअर बाजारावरही या वृत्ताचा सकारात्मक परिणाम दिसत आहे.

'आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी ग्रीसला पुन्हा एकदा कर्ज देण्यावर युरोपियन देशांच्या नेत्यांमध्ये एकमत झाले आहे. यासाठी ESM Programme तयार करण्‍यात येणार असल्याचे डोनाल्ड टस्क यांनी आपल्या 'ट्‍वीट'मध्ये म्हटले आहे. युरोपियन संघातर्फे ग्रीसला हे तिसर्‍यांचा बेलआऊट पॅकेज दिले जात आहे.

युरोपियन स्टॅबिलिटी मॅकेनिज्म अर्थात 'ईएमएस प्रोग्राम' बनवण्यात आला आहे. ग्रीसला 86 बिलियन युरोचे पॅकेज मिळणार आहे. ग्रीसचे पंतप्रधान अलेक्सिस त्सिप्रास यांनी देखील हे पॅकेज स्वीकारण्यास संमती दर्शवली आहे.

16 तास चालली बैठक
युरोझोनमधील नेत्यांच्या बैठकीत ग्रीसला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी तसेच त्याच्या भविष्यासंदर्भात चर्चा झाली. तब्बल 16 तास ही चर्चा चालली. चर्चेनंतर ग्रीसला तिसर्‍यांदा बेल आऊट पॅकेज देण्यावर एकमत झाले. ग्रीस युरोझोनमध्ये कायम राहावा, हा या मागील उद्देश आहे.

ग्रीसला युरोझोनमधून बाहेर पडू देणार नाही- जेन क्लूड जंकर
ग्रीसला युरोझोनमधून बाहेर जाऊ देणार नसल्याचे युरोपियन संघाचे कमीशन हेड जेन क्लूड जंकर यांनी म्हटले आहे. ग्रीससाठी हा कठीन काळ आहे. युरोपिय संघासोबत झालेला करार फारच गुंतागुंतीचा आहे. परंतु, याला दुसरा पर्याय नसल्याचे पंतप्रधान अलेक्सिस त्सिप्रास यांनी पत्रकारांसमोर सांगितले.

पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा, यामुळे चिघळली होती परिस्थिती...