आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • European And Asian Markets Due To Rapid Global Indicators Of The Stock Before The Meeting Of The US Federal Reserve

जागतिक संकेतांमुळे शेअर अमेरिकी फेडरल रिझर्व्हच्या बैठकीच्या आधी युरोपीय आणि आशियाई बाजारात तेजी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली : अमेरिकी फेडरल रिझर्व्हच्या बैठकीच्या आधी युरोपीय आणि आशियाई बाजारात तेजी दिसून आली. त्याचा परिणाम भारतीय बाजारात देखील दिसून आला.
मुंबई शेअर बाजारातील ३० शेअरचा समावेश असलेला प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स १८३ अंकाच्या वाढीसह २६,६९७ अंकाच्या पातळीवर बंद झाला, तर राष्ट्रीय शेअर बाजारातील ५० शेअरचा समावेश असलेला प्रमुख निर्देशांक निफ्टी ५१ अंकाच्या वाढीसह ८२२१ अंकाच्या पातळीवर बंद झाला.

ऑटो आणि आयटी क्षेत्रात सर्वाधिक तेजी नोंदवण्यात आली, तर टाटा मोटर्स, बीपीसीएल, विप्रो आणि रिलायन्स उद्योग समूहाच्या शेअरमध्ये वाढ नोंदवण्यात आली आहे. सकाळच्या सत्रात सेन्सेक्स २६ अंक वरती २६५४१ तर निफ्टी ८ अंक वाढून उघडला होता.

फेडरल रिझर्व्हच्या बैठकीआधी अमेरिकी बाजारात संमिश्र व्यवहार दिसून आला. सोमवारी झालेल्या व्यवहारात डाओ झोन्स पुन्हा एकदा उच्चांकी पातळीवर पोहोचला आहे, तर दुसरीकडे युरोपियन बाजारात देखील सकारात्मक वाढ नोंदवण्यात आली. आशियाई बाजारात देखील वाढ नोंदवण्यात आल्यामुळे भारतीय बाजारात सकारात्मक धारणा तयार होऊन खरेदी झाली असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
बातम्या आणखी आहेत...