आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एव्हरस्टोन करणार व्हिडिओकॉनच्या केनस्टारची 1,300 कोटींमध्ये खरेदी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- खासगी शेअर संस्था एव्हरस्टोन, व्हिडिओकॉन समूहाची कंपनी केनस्टार विकत घेणार अाहे. एव्हरस्टोनच्या वतीने देण्यात आलेल्या माहितीनुसार या करारात केनस्टार ब्रँड आणि एका उत्पादन प्रकल्पाचा समावेश आहे. हा करार किती रुपयांचा असेल, याबाबतचा खुलासा करण्यात अालेला नाही. मात्र, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एव्हरस्टोनने सुरुवातीला १,३०० कोटी रुपयांची बोली लावली होती. अाधी क्रॉम्प्टन ग्रीव्हज केनस्टारची खरेदी करणार होती. मात्र, आता या कंपनीने माघार घेतली आहे. सिंगापूरच्या टेमासेकची गुंतवणूक असलेल्या क्रॉम्प्टन ग्रीव्हजने या करारासाठी १,४०० कोटी रुपयांची बोली लावली होती.
  
राजीव केन्यू यांच्या नेतृत्वातील सध्याच्या केनस्टार व्यवस्थापनासोबतच काम करणार असल्याचे एव्हरस्टोनने सांगितले आहे. यात कंपनी अतिरिक्त गुंतवणूकदेखील करणार आहे. या कराराला अंतिम स्वरूप देण्यासाठी लवकरच व्हिडिओकॉन संचालकांसोबत बैठक घेऊन करार करण्यात येणार अाहे. व्हिडिओकॉन समूहाच्या मालकीचा असून या समूहावर ४३,००० कोटी रुपयांचे कर्ज आहे. या कर्जाची परतफेड करण्यासाठीच समूहाने केनस्टारच्या विक्रीचा निर्णय घेतला आहे.  

किचन अप्लायन्सेस इंडिया या नावाने १९९५ मध्ये केनस्टारची स्थापना झाली होती. २०१५ मध्ये १,९३९ कोटी रुपयांचे उत्पन्न झालेल्या या कंपनीला २६.४ कोटी रुपयांचे नुकसान झाले होते. कंपनी मिक्सर ग्राइंडर, एअर कंडिशनर, कूलर यासारख्या गृहोपयोगी वस्त्ूंचे उत्पादन करते.
 
दोन वर्षांत दुसरे अधिग्रहण  
दोन वर्षांत एव्हरस्टाेनचे हे दुसरे अधिग्रहण आहे. याआधी कंपनीने एप्रिल २०१६ मध्ये हिंदुस्तान युनिलिव्हरच्या ब्रेड अँड बेकरी विभाग ‘मॉडर्न’ची खरेदी केली होते. एकूण १२,००० कोटी रुपयांचा व्यवसाय असलेल्या सुमारे ३० कंपन्यांमध्ये एव्हरस्टोनने गुंतवणूक केली आहे. रितू कुमार, एस. चांद समूह, ओजोन, बर्गर किंग, डॉमिनोजसारख्या कंपन्यांमध्येही या कंपनीने गुंतवणूक केलेली आहे.
 
पाच कंपन्यांची रुची 
व्हिडिओकॉन समूह सुमारे वर्षभरापासून केनस्टारची विक्री करण्याचा प्रयत्न करत आहे, तर खरेदी करण्यासाठी क्रॉम्प्टन ग्रीव्हज, हॅवेल्स, व्होल्टास, ओरिएंट इलेक्ट्रिक आणि सिम्फनी या कंपनीने रुची दाखवली होती.
 
डीटीएच व्यवसायाचीही विक्री
व्हिडिओकॉनने त्यांचा डीटीएच व्यवसाय विक्री करण्याचाही निर्णय घेतला आहे. कंपनीचा हा व्यवसाय डी-टू-एच नावाने आहे. हा व्यवसाय डिश टीव्हीला विक्री करण्यात येणार अाहे. समूहाने सहा विभागातील स्पेक्ट्रमदेखील सुमारे ४,४०० कोटी रुपयात एअरटेलला विक्री केले आहेत.
 
आरकॉम डीटीएच व्यवसायाची व्हिकॉन मीडियाला विक्री
अनिल अंबानी समूहाची कंपनी रिलायन्स कम्युनिकेशन्स (आरकॉम) त्यांचा डीटीएच व्यवसाय व्हिकॉन मीडिया अँड टेलिव्हिजनला विक्री करणार आहे. कंपनी हा व्यवसाय रिलायन्स बिग टीव्ही नावाने चालवते. डीटीएच व्यवसायाच्या विक्रीची घोषणा कंपनीने ३० ऑक्टोबर रोजी केली होती. बँकांच्या कर्जाची परतफेड करण्यासाठी कंपनीने हा निर्णय घेतला आहे. कंपनीवर एकूण ४४,३०० कोटी रुपयांचे कर्ज आहे. कर्ज फेडण्यासाठी कंपनी स्पेक्ट्रम, टॉवर आणि फायबर व्यवसायाचीही विक्री करणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे.
 
बातम्या आणखी आहेत...