आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

60 कर्मचाऱ्यांसह माजी महिला कर्मचारी गुगलवर खटला दाखल करण्याच्या तयारीत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सन फ्रान्सिस्को- स्त्री आणि पुरुषात भेदभाव होत असल्याच्या प्रकरणात गुगलच्या अडचणी वाढत असल्याचे दिसून येत आहे. गुगलमधील अभियंता जेम्स डेमोर यांनी लिहिलेले पत्र (इंटर्नल मेमोरँडम) सार्वजनिक झाल्यानंतर कर्मचारी कायदेशीर लढाईची तयारी करत आहेत. ब्रिटिश वृत्तपत्र ‘द गार्डियन’नुसार कमीत कमी ६० कर्मचारी आणि माजी कर्मचारी महिलांनी भेदभावाच्या मुद्द्यावर गुगलच्या विरोधात सामूहिक खटल्याची (क्लास अॅक्शन) तयारी केली आहे. अशा प्रकारच्या खटल्यात लोकांचा समूहवादी असतो. नंतर या खटल्याशी अनेक महिला जोडल्या जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कामाचे ठिकाण, भूमिका आणि कामगिरीच्या आधारावर पगारात अंतर असू शकते मात्र, याच्याशी स्त्री-पुरुष अशा भेद भावाशी काहीही संबंध नसल्याचे स्पष्टीकरण गुगलच्या प्रवक्त्यांनी दिले आहे.  

पत्र लिहिणाऱ्या गुगलच्या अभियंत्याला गुगलने दोन दिवसांपूर्वीच कामावरून कमी केले आहे. त्याने लिहिले होते की, ‘महिला आणि पुरुषांच्या योग्यतेतील अंतराचे एक कारण बायोलॉजिकल आहे. तंत्रज्ञान आणि नेतृत्वाच्या बाबत महिलांचे प्रतिनिधित्व समान का नाही, हे यावरूनच लक्षात येते.’ त्यानंतर कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) सुंदर पिचाई यांनी कर्मचाऱ्यांना ई-मेलदेखील पाठवला अाहे.

अमेरिकेतील कामगार विभागानेही लावले आरोप
समान योग्यता आणि जबाबदारी असतानासुद्धा पुरुषांच्या तुलनेत कमी पगार मिळाला अाहे, असे वाटणाऱ्या महिलांच्या वतीने याचिका दाखल करण्याची तयारी नागरी हक्क प्रकरणातील एका वकिलाने केली आहे. गुगलवर अमेरिकेतील कामगार विभागानेही आरोप लावलेले आहेत. 
बातम्या आणखी आहेत...