आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेअर बाजारासाठी अार्थिक वातावरण अनुकूल नाही

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मागील अाठवड्यात शेअर बाजारात अपेक्षेपेक्षा जास्त पडझड झाली. निफ्टीचा व्हाॅल्यूम वाढूनही ताे ८४६५ अंकांपेक्षा वरच्या पातळीवर तग धरू शकला नाही. काही कालावधीसाठी ही पातळी अाेलांडल्यानंतर निफ्टीने ८५०४.९५ अंकांची अाधार पातळी ताेडून घसरणीचा कल दाखवला. अाश्चर्याची गाेष्ट अशी की, मंगळवारी िनफ्टीने ८१७२ अंकांच्या भक्कम अाधार पातळी जवळ अाल्यानंतर ८१८५.१५ अंकांच्या खालच्या पातळीला स्पर्श केला. त्यानंतर िनफ्टीने पुन्हा उसळी घेतलेली बघायला मिळाली अाणि अंतत: िनफ्टीचा िनर्देशांक ८२८५.६० अंकांच्या पातळीवर बंद झाला. मागच्या काॅलममध्ये म्हटल्याप्रमाणे िनफ्टी ८२७० अंकांच्या अाधार पातळीच्या खूप जवळ अाहे.

शेअर बाजारात नरमाई येणे बऱ्याच काळापासून अपेक्षित हाेते. कारण तेजीनंतर समभागांच्या िकमतीत बरीच वाढ झाली हाेती अाणि बाजारात करेक्शन येण्याची शक्यता निर्माण झाली हाेती. विदेशी गुंतवणूकदारांवर लावण्यात अालेला कर अाणि कंपन्यांच्या खराब अार्थिक िनकालांमुळे विक्रीचा दबाव वाढला. िनर्यातीत घट येण्यासारख्या काही अार्थिक संकेतांनीदेखील बाजाराच्या िचंतेत भर घातली अाहे. डाॅलरच्या तुलनेत रुपया कमजाेर झाला अाहे. अर्थात ही शक्यता पहिल्यापासूनच हाेती. त्यामुळे अल्प काळात िनर्यातदारांना मदत िमळेल; पण अायात महागणार, यामुळे महागाई वाढण्याची शक्यताही अाहे. हा सगळा िवचार करता हे िचत्र सध्या असल्याने ते बाजारासाठी अनुकूल अाहे, असे म्हणता येणार नाही. त्यामुळेच मंगळवारी चांगली उसळी मारूनही घसरगुंडी हाेण्याची शक्यता नाकारता येत नाही. मंगळवारची उसळी ही गुरुवारच्या डेरिव्हेटिव्हज व्यवहारांच्या अंितम तारखेच्या पहिल्यांदा खालच्या पातळीवर खरेदी करण्याच्या दृष्टीने बघितली जाऊ शकते.
जागतिक स्तरावर शेअर बाजारांचे िनकाल बृहद् पातळीवर सतर्कतेबराेबरच सकारात्मक अाहेत. अमेरिकेत कंपन्यांच्या उत्पन्नाबाबत िचंतेचे वातावरण अाहे. त्याच वेळी गृहनिर्माण क्षेत्रातील सकारात्मक अाकड्यांमुळे तेथील व्याजदरात वाढ हाेण्याची शक्यता अाहे. फेडरल िरझर्व्हची दाेन िदवसांची बैठक बुधवारी संपत अाहे. फेडरल बँक व्याजदर कधी वाढवणार याचे संकेत िमळण्यासाठी गुंतवणूकदारांचे या बैठकीच्या िनकालाकडे लक्ष लागले अाहे.

शेअर बाजारातील अंडरटाेन कमजाेर झाला अाहे. शेअर बाजारातील घसरणीचा रस्ता खुला झाला अाहे. येणाऱ्या िदवसांमध्ये अाणखी घसरण बघायला िमळू शकते. िनफ्टीला खालच्या पातळीवर ८१७२ अंकांच्या अासपास महत्त्वपूर्ण अाधार अाहे. हा एक मुख्य अाधार बनू शकताे. जर िनफ्टी या पातळीच्याही खाली येऊन बंद झाला तर पुढचा अाधार ७९९७ अंकांच्या अासपास िमळेल, जाे एक मध्यम अाधार असेल. त्यानंतर िनफ्टीला ७९६१ अंकांच्या अासपास पुढचा चांगला अाधार िमळेल. वाढलेल्या िनफ्टीला वरच्या पातळीवर पहिला प्रतिकार ८३६८ अंकांच्या अासपास िमळेल. हा एक मध्यम अाधार असेल. त्यानंतर ८५०६ अंकांच्या पातळीवर माेठा प्रतिकार िमळेल, जाे शाॅर्ट टर्ममध्ये िनफ्टीसाठी फायदा िनकाल िनश्चित करेल. समभागांमध्ये या अाठवड्यात स्टेट बँक अाॅफ इंिडया अाणि टाटा स्टील िलमिटेड चार्टवर चांगले िदसत अाहेत. स्टेट बँकेच्या समभागाची विद्यमान बंद पातळी २७२.५० रुपये अाहे. त्यानंतरचे पुढचे लक्ष्य २७८ रुपये अाणि स्टाॅप लाॅस २६५ रुपये अाहे. टाटा स्टीलचा िवद्यमान बंद भाव ३७१.२५ रुपये अाहे. या समभागाचे पुढचे लक्ष्य ३७९ रुपये अाणि स्टाॅप लाॅस ३६२ रुपये अाहे.

लेखक तांत्रिक विश्लेषक व moneyvistas.com चे सीईओ आहेत. vipul.verma@dbcorp.in