आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डिसेंबरमध्ये निर्यात 14.75 टक्के घटली, सोन्याची आयात 179 टक्क्यांनी वाढली,

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - निर्यात क्षेत्रात तेजी आणण्यात सरकारला यश आलेले नाही. डिसेंबर २०१५ मध्ये निर्यातीत सलग १३ व्या महिन्यात घसरण नोंदवण्यात आली आहे. डिसेंबर २०१५ मध्ये निर्यात १४.७५ टक्क्यांनी घसरून २,२३० कोटी डॉलरवर (सुमारे १.४८ लाख काेटी रुपये) आली आहे. नोव्हेंबर २०१५ मध्ये निर्यात २४.४ टक्क्यांनी घसरून २००१ कोटी डाॅलरवर अाली होती. डिसेंबरमध्ये सरकारला व्यापार तोट्याबाबत दिलासा मिळालेला नाही. व्यापार तोटा वाढून १,१६६ कोटी डॉलरवर गेला अाहे. नोव्हेंबर २०१५ मध्ये हाच आकडा ९.७८ अब्ज डाॅलर होता. कच्च्या तेलाची आयात कमी झाली असून सोन्याची आयात मात्र १७९ टक्क्यांनी वाढली आहे.

वाणिज्य मंत्रालयाने सोमवारी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, डिसेंबर २०१५ मध्ये आयात ३.९ टक्क्यांनी कमी झाली असून ३,३९६ कोटी डाॅलरवर (२.२६ लाख कोटी रुपये) आली. डिसेंबर २०१४ मध्ये आयात ३,५३३ कोटी डाॅलरची झाली होती. नोव्हेंबर २०१५ मध्ये आयात ३० टक्क्यांनी घटून २९८० कोटी डॉलरवर आली होती.
व्यापार तोटा वाढला : डिसेंबर २०१५ मध्ये व्यापार तोटा (निर्यात आणि आयातमधील अंतर) वाढून ११६६ कोटी डाॅलरवर आला आहे. नोव्हेंबर २०१५ मध्ये हाच आकडा ९.७८ अब्ज डॉलर होता. डिसेंबर २०१४ मध्ये व्यापार तोटा ९१८ कोटी डाॅलर होता. हा आकडा अॉगस्ट २०१४ नंतर सर्वाधिक आहे. गेल्या वर्षी आॅगस्टमध्ये व्यापार तोटा १२४७ कोटी डाॅलर होता.
कच्च्या तेलाची निर्यात घटली
डिसेंबर २०१५ मध्ये कच्च्या तेलाची निर्यात ३३.२ टक्क्यांनी घसरून ६६६ कोेटींवर आली आहे. वास्तविक नॉन आॅइल निर्यात ७.६ टक्क्यांनी वाढून २७३० कोटी डॉलरवर गेली आहे. गेल्या महिन्यात पेट्रोलियम उत्पादनांची निर्यात ४७.७ टक्क्यांनी कमी होऊन २३७ कोटी डॉलरवर आली आहे.
सोन्याची आयात वाढली : वाणिज्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या अाकडेवारीनुसार डिसेंबरमध्ये देशातील सोन्याची आयात वार्षिक आधारावर १७९.१ टक्क्यांनी वाढून ३८१ कोटी डाॅलर झाली आहे. तर डिसेंबर २०१५ मध्ये जेम्स अँड ज्वेलरीच्या आयातीत ७.८ टक्क्यांची घसरण होऊन ती २४६ कोटी राहिली.