आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Exports Of 10 Key Agricultural Products In Negative Zone

देशातील कृषी उत्पादन निर्यातीत घट

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - देशातील कृषी उत्पादनांपैकी जुलै महिन्यात अनेक उत्पादनांची निर्यात घटली आहे. यामध्ये तांदूळ, कॉफी, मसाले, तेलबिया, फळे आणि भाज्यांचादेखील समावेश आहे. अर्थ मंत्रालयाच्या वतीने १३ मुख्य कृषी उत्पादनांवर लक्ष ठेवले जाते. यातील १० उत्पादनांच्या निर्यातीमध्ये घट झाली आहे. जागतिक बाजारातील दर कमी झाल्यानेच निर्यातीवर परिणाम झाल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. देशांतर्गत बाजारात इतर देशांच्या तुलनेत दर जास्त असल्याचे मत निर्यातदारांची संघटना फिओचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजय सहाय यांनी व्यक्त केले. देशातील बाजारात जास्त भाव मिळत असल्यानेच निर्यातीवर परिणाम झाल्याचे त्यांनी सांगितले.

यामध्ये तांदळाची निर्यात ६.७ टक्के, मसाल्याची २.५ टक्के, तंबाखूची ३.४१ टक्के, तेलबियांची ३०.९८ टक्के, तर फळांची निर्यात ११.३८ टक्के कमी झाली आहे. दूध आणि पोल्ट्री उत्पादनाच्या निर्यातीतदेखील ७.३४ टक्के घट झाली आहे. देशातील एकूण निर्यातीपैकी कृषी उत्पादनांची हिस्सेदारी १० टक्के आहे. यात जुलै महिन्यात घट होऊन १०.३ टक्क्यांनी कमी म्हणजेच २३.१३ अब्ज डॉलरवर आली आहे. यात सलग आठ महिन्यांपासून घट होत आहे. ऑगस्ट महिन्यात आॅइल मिल (ढेप) निर्यातीत ४२ टक्के घट झाली आहे. गेल्या महिन्यात ९१,८३४ टन ढेपेची निर्यात झाली.