सोशल मीडियातील अग्रेसर साइट '
फेसबुक'ने आपल्या सर्व कर्मचार्यांना मॅटरनिटी/पॅटरनिटी पॉलिसी लागू केल्याची घोषणा केली आहे. ही पॉलिसी आधी केवळ अमेरिकेत लागू होती. आता मात्र या पॉलिसीचा लाभ फेसबुकच्या जगभरातील सर्व कर्मचार्यांना मिळणार आहे. मॅटरनिटी/पॅटरनिटीदरम्यान कर्मचार्यांना 4 महिन्यांच्या प्रदीर्घ सुटीवर जाता येणार आहे.
फेसबुकचे सीईओ मार्क झुकरबर्ग दोन 2 महिन्यांच्या प्रदीर्घ सुटीवर जाणार आहे. मार्कच्या घरी नवा पाहुणा येणार आहे. काही दिवसांपूर्वी खुद्द मार्कने हे जाहीर केले होते. त्यानंतर मार्क यांनी कंपनीच्या सर्व कर्मचार्यांना मॅटरनिटी/पॅटरनिटी पॉलिसी लागू करण्याचा निर्णय घेतला होता.
मला हे सांगताना खूप आनंद होत आहे. आता पॅटरनिटी पॉलिसी सर्व कर्मचार्यांना लागू करण्यात आली आहे. जे कर्मचारी अमेरिकेबाहेरील आहेत त्यांना देखील आता या पॉलिसीचा फायदा मिळणार असल्याचे फेसबुकचा कर्मचारी लॉरी मेल्टॉफ गोलरने ट्वीट केले आहे.
फेसबुकचे 12 हजारांहून जास्त कर्मचारी...फेसबुकमध्ये 12 हजारांहून जास्त कर्मचारी काम करतात. यातील सर्वाधिक कर्मचारी हेडक्वार्टरमध्ये काम करतात. उर्वरित कर्मचारी जगभरात वेगवेगळ्या ऑफिसमध्ये काम करतात. यात डबलिन ते दिल्ली व दुबईच्या ऑफिसचा समावेश आहे.
मार्कला प्राप्त होणार कन्यारत्न...मार्कला कन्यारत्न प्राप्त होणार आहे. मार्कच्या गैरहजेरीत त्याच्या कामाची जबाबदारी कोण बघणार? यासंदर्भात अद्याप निर्णय घेण्यात आलेला नाही. दरम्यान, मार्कने मॅटरनिटी/पॅटरनिटी पॉलिसी लागू केल्याची पोस्ट करताच अवघ्या एक तासात 50 हजारांहून जास्त यूजर्सनी लाईक केले होते तर तीन हजारांहून जास्त युजर्सने कमेंट केले होते.