आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Facebook Founder Mark Zuckerberg And Priscilla Chan Love Life

वॉशरूमबाहेर पहिल्यांदा भेटले होते हे प्रेमीयुगुल, वाचा, झुकरबर्ग व प्रिशिलाची LOVE LIFE

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फेसबुकचा फाउंडर मार्क झुकरबर्ग आणि पत्नी प्रिशिला चान - Divya Marathi
फेसबुकचा फाउंडर मार्क झुकरबर्ग आणि पत्नी प्रिशिला चान
सोशल नेटवर्किंग साइट 'फेसबुक'द्वारा लाखों प्रेमीयुगुलांची भेट घडवणारा मार्क झुकरबर्गची Love Story खूपच लक्षवेधी आहे. 12 वर्षांपूर्वी झुकरबर्ग पहिल्यादा आपल्या जीवनसाधीला भेटला होता. divyamarathi.com आपल्या वाचकांना 'फेसबुक'चा फाउंडर मार्क झुकरबर्ग आणि त्यांची पत्नी प्रिशिला चानच्या 'लव्ह लाइफ' सांगत आहे.

वॉशरुम बाहेर अचानक भेटले झुकरबर्ग-प्रिशिला
मार्क झुकरबर्ग आणि प्रिशिलाचे शिक्षण हार्वर्ड यूनिव्हर्सिटीत झाले. 2003 मध्ये दोघे एका पार्टीत सहभागी झाले होते. झुकरबर्ग वॉशरूमबाहेर उभा होता. तितक्यात त्याचे लक्ष रांगेत उभ्या असलेल्या एका युवतीकडे गेले. ही युवती म्हणजेच प्रिशिला चान. झुकरबर्गने संधी पाहून प्रिशिलासोबत ओळख केली. काही दिवसांत या ओळखीचे मैत्रीत आणि नंतर मैत्रीचे प्रेमात कसे रुपांतर झाले हे दोघांनीही कळले नाही. 19 मे 2012 ला दोघे विवाहबद्ध झाले.

झुकरबर्गच्या घरी हलणार पाळणा
मार्क आणि प्रिशिलाच्या घरी लवकरच पाळणा हलणार आहे. ही माहिती खुद्द मार्कने काही दिवसांपूर्वी 'फेसबुक'वरून दिली होती. प्रिशिलाचा यापूर्वी तिनदा गर्भपात झाल्याचेही मार्कने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
प्रिशिला 'फेसबुक'ची पहिली यूजर
मार्क झुकरबर्ग यांनी 'फेसबुक'ची संपूर्ण योजना पत्नी प्रिशिलाला समजावून सांगितली. प्रिशिलाने देखील पतीला सगळ्या कामात मदत करण्याचे आश्वासन दिले. झुकरबर्गने 'फेसबुक'साठी शिक्षण सोडले. 'फेसबुक' सुरु झाल्यानंतर पहिला युजर म्हणून प्रिशिलाने रजिस्ट्रेशन केले. झुकरबर्गने कॅलिफोर्नियात ऑफिस सुरु केल्यानंतर प्रिशिलाही पतीसोबत शिफ्ट झाली.

झुकरबर्गने पत्नीकडून शिकली चायनीज
झुकरबर्ग व प्रिशिला सेंट फ्रान्सिकोमध्ये डेटिंगवर जात होते. दोघे वेगवेगळ्या बोटीतून जात होते. झुकरबर्गच्या हट्टामुळे हा प्रकार होत होता.

प्रिशिलाचे आई-वडील बोस्टनमध्ये रिफ्युजी आहेत. दोघे एका रेस्तरॉंमध्ये काम करतात. प्रशिला तिच्या आजीकडे लहानाची मोठी झाली. झुकरबर्गने पत्नीकडूनच चायनीज भाषा शिकली.

पुढील स्लाइडवर पाहा, मार्क झुकरबर्ग आणि पत्नी प्रिशिलाचे निवडक PHOTOS...