आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

FACEBOOK इंडियाच्या हेड कीर्तिगा रेड्डींचा राजीनामा, नांदेडच्या MGM मधून घेतले होते शिक्षण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई/ नवी दिल्ली- सोशल नेटवर्किंग साइट 'फेसबुक'ची इंडिया हेड कीर्तिगा रेड्डी यांनी राजीनामा दिला आहे. दूरसंचार नियामक ट्रायने 'नेट न्यूट्रॅलिटी'च्या बाजूने निर्णय दिल्यानंतर 'फेसबुक'ला मोठा झटका बसला आहे. काही दिवसांपूर्वी फेसबुकने रिलायन्स कम्युनिकेशन्सशी करार करून काही वेब सेवा मोफत (फ्री बेसिक्स) देण्याची घोषणा केली होती.

दूरसंचार कंपन्या कंटेंट, अॅप इत्यादींच्या वापरासाठी लोकांकडून वेगवेगळे शुल्क आकारू शकणार नाहीत. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या मोबाइल सेवाप्रदात्यांना दररोज 50 हजार रुपये दंड भरावा लागेल. दूरसंचार नियामक ट्रायने नेट न्यूट्रॅलिटीजचे (इंटरनेट तटस्थते) समर्थन करताना हा आदेश दिला.

ट्रायच्या महत्त्वपूर्ण निर्णयानंतर 'फेसबुक'ने 'फ्री बेसिक्स' भारत बंद करण्याची घोषणा केली आहे. या पार्श्वभूमीवर कीर्तिगा रेड्डी यांनी रामराम ठोकला आहे.

'फॉर्च्युन-50'मध्ये झळकल्या होत्या कीर्तिगा...
- कीर्तिगा रेड्डी या महाराष्ट्रातील नांदेड येथील आहे. इंजिनियरिंगची पदवी घेतल्यानंतर त्यांनी स्टेनफोर्ड युनिव्हर्सिटीतून एमबीए केले.
- 'फार्च्युन'ने 2011 मध्ये जाहीर केलेल्या देशातील 50 प्रभावशाली महिलांमध्ये कीर्तिगा यांना स्थान देण्यात आले आहे.
- 'मला माहीत होते, एक दिवस पुन्हा अमेरिकेत जावे लागेल.', असे कीर्तिगा यांनी काही दिवसांपूर्वी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये लिहिले होते. पुढील 6 ते 12 महिन्यात काहीच बदलणार नाही. आपल्या मुलींसोबत हा काळ आनंदात घालवेल. मेनलो पार्कमधील 'फेसबुक'मध्ये कीर्तिगा नव्या संधीच्या शोधत आहेत.
- कंपनीच्या सूत्रांनी सांगितले की, कीर्तिगा यांच्याकडून राजीनामा अपेक्षीत नव्हता.
- कीर्तिगा रेड्‌डी या भारतातील 'फेसबुक'च्या पहिल्या कर्मचारी होत्या.
- 'फेसबुक'मध्ये येण्यापूर्वी त्या मोटोरोला कंपनीत प्रॉडक्ट मॅनेजमेंट डिपाटर्मेंटच्या डायरेक्टर होत्या.
- मोटोरोलाच्या आधी त्या सिलिकॉन ग्राफिक्स व फीनिक्स टेक्नॉलॉजीत काम करत होत्या.

काय आहे फेसबुकची फ्री बेसिक्स सेवा?
याचे जुने नाव इंटरनेट डॉट ओआरजी होते. यात इंटरनेटवरील निवडक संकेतस्थळे मोफत पाहावयास मिळतात. यात आरोग्य, प्रवास, नोकरीसह काही सरकारी सेवांचा समावेश आहे. तर इतर संकेतस्थळे पाहण्यासाठी अतिरिक्त पैसे द्यावे लागतात. फेसबुकचे सीईओ मार्क झुकेरबर्ग यांच्या मते फ्री बेसिक्स प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून गरिबांनाही इंटरनेटचा वापर करणे शक्य आहे.

पुढील स्लाइडवर पाहा, कीर्तिगा रेड्‍डी यांचे निवडक फोटोज...