आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Facebook\'s New Suggested Video Feature Will Let User Earn Money

\'फेसबुक\' युजर्ससाठी खूशखबर, व्हिडिओ अपलोडिंगवर मिळेल पैसा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फेसबुक युजर्ससाठी खूशखबर आहे. आता फेसबुकच्‍या टाईमलाईन आणि फेसबुक पेजवर व्हिडिओ अपलोड केल्यावर पैसे मिळणार आहेत. फेसबुकवर अपलोड केलेल्‍या व्हिडिओची फेसबुक जाहिरात करणार आहे. या जाहिरातीच्‍या उत्‍पन्‍नामधून युजर्सलाही वाटा दिला जाणार आहे. त्‍यासाठी फेसबुक एक नवी 'सजेस्‍टेड व्हिडिओ' फीचरवर काम करत आहे.
फेसबुकच्‍या नव्या 'सजेस्‍टेड व्हिडीओ' फीचरची सध्या आयफोनवर चाचणी घेण्याचे काम सुरु आहे. आतापर्यंत युजर्स युटयूबवर व्हिडिओ शेअर करून पैसे कमावत होते. परंतु आता सोशल नेटर्वकिंग साईट फेसबुकनेही 'सजेस्‍टेड व्हिडिओ' फीचरच्‍या माध्‍यमातून युजर्सला पैसे कमवण्‍याची संधी देणार आहे. व्हिडिओ ओरिजनल असावा लागणार आहे. त्‍यावर कोणाचे कॉपीराईट नसावे, याची युजर्सला खात्री द्यावी लागणार आहे. त्यामुळे आता फेसबुकचा 'सजेस्‍टेड व्हिडिओ' फीचर युट्यूबशी स्‍पर्धा करणार आहे.