आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सर्वाधिक मासिक उत्पन्न मिळवण्यात पणजी अव्वल, टॉप-10 मध्ये दोनच मेट्रो सिटी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- रोजगार आणि उत्पन्नाविषयी जेव्हा चर्चा रंगतात. तेव्हा देशाची राजधानी 'दिल्ली' आणि आर्थिक राजधानी 'मुंबई'चा आवर्जुन उल्लेख केला जातो. कारण, या दोन्ही मेट्रो सिटीशिवाय चर्चा पूर्ण होवूच शकत नाही. त्यामुळेच या मेट्रो सिटीतील झगझगाट आणि लाइफस्टाइलकडे आकर्षित होऊन बहुतांशी लोक नोकरी किंवा व्यवसाय सुरु करण्‍यासाठी दिल्ली-मुंबईला प्राधान्य देतात. मात्र, आय अर्बन मार्केट प्लानर फर्म 'बीबीडीओ'ने प्रसिद्ध केलेला अहवाल दिल्लीसह मुंबईसाठी धक्कादायक आहे.

सर्वाधिक मा‍सिक उत्पन्न मिळवणारी कुटुंबे ही दिल्ली किंवा मुंबईतील नसून गोव्यात आहेत.
गोव्याची राजधानी पणजी येथील 75 टक्के कुटुंबे अशी आहेत की, या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तिचे मासिक उत्पन्न 10 हजार रुपयांपेक्षा जास्त आहे. या तुलनेत देशाची आर्थिक राजधानी मुंबई याबाबतीत अजून खूप मागे आहे.
पणजी अव्वल
बीबीडीओच्या अहवालात सर्वाधिक मासिक उत्पन मिळवणार्‍या कुटुंबे असलेल्या 'टॉप-10' शहरांची यादी देण्यात आली आहे. त्यात पणजी अव्वल स्थानावर आहे. पणजीतील बहुतांशी कुटुंबांतील प्रत्येक सदस्याचे मासिक उत्पन्न 10 हजार रुपयांपेक्षा जास्त आहे. पणजीतील 77 टक्के कुटुंबे अशी आहेत की, कुटुंबातील प्रत्येक सदस्याचे मासिक उत्पन्न 10 हजार रुपयांपेक्षा जास्त आहे. याआधीच्या यादीत पणजी तिसर्‍या क्रमांकावर होते.
पुढील स्लाइडवर क्लिक करून जाणून घ्या, बीबीडीओचे जाहीर केलेल्या यादीतील टॉप-10 शहरे...
(टीप: छायाचित्रांचा वापर फक्त सादरीकरणासाठी करण्‍यात आला आहे. )