आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यातील शेतकऱ्यांना आठवडी बाजारातून सहा काेटींचे उत्पन्न; १३० आठवडी बाजार,

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- व्यापारी आणि अाडतीच्या चक्रव्यूहातून शेतमालाची सुटका करतानाच शेतकऱ्यांना त्यांचा शेतमाल थेट शहरात विकण्याची मुभा देणाऱ्या ‘संतशिरोमणी श्री सावता माळी आठवडी बाजार’ योजनेस शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. राज्यातल्या   जवळपास १३० ठिकाणी असे आठवडी बाजार सुरू असून त्यातून शेतकऱ्यांना दर आठवड्याला एकत्रितपणे सहा ते सव्वासहा कोटी रुपये उत्पन्न मिळते. गेल्या वर्षभरात या बाजाराच्या माध्यमातून २५० ते ३०० काेटी रुपयांची  उलाढाल झाली अाहे.  

शेतमालाला योग्य भाव मिळवून देण्यासोबतच ग्राहकांना रास्त दरात धान्य, भाजीपाला उपलब्ध व्हावा, यासाठी आठवडी बाजार  संकल्पना गेल्या वर्षी १२ अाॅगस्टला सुरू झाल्यानंतर शेतकरी तसेच ग्राहकांचा या अभियानाला चांगला प्रतिसाद मिळत अाहे. ठाणे, मुंबई अाणि नवी मुंबई शहरात शेतकऱ्यांना अापल्या फळे व भाजीपाल्याची थेट विक्री करण्याची सुविधा मिळाल्यामुळे त्यांना किरकोळ विक्री करण्याचा नवा पर्याय मिळाला. शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून चालवण्यात येणाऱ्या या बाजारात आठवड्याला एक  हजार ते बाराशे मेट्रिक टन फळे व भाजीपाल्याची विक्री हाेऊन अंदाजे सहा काेटी रुपये तर वर्षाला २५० ते ३०० काेटी रुपयांची उलाढाल हाेत असल्याचे महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाचे कृषी व्यापार विकास सहायक सरव्यवस्थापक डाॅ. भास्कर पाटील यांनी माहिती देताना सांगितले.   

आठवडी बाजाराची रचना व ताे कसा चालताे याची माहिती, मालाची योग्य प्रत कशी राखावी, किरकोळ विक्रीचे गणित, शेतमाल विक्री स्टाॅल या सर्वाबाबत शेतकऱ्यांना पुरेसे प्रशिक्षण दिल्यानंतर त्यांचा शेतीपासून ते बाजारापर्यंतचा मार्ग सुकर हाेतो. त्यामुळे गेल्या वर्षभरात दहा ते अकरा  शहरांत १३० ठिकाणी बाजार भरत असला तरी अजून २५ शहरे बाकी अाहेत. त्यामुळे या चळवळीला अाणखी वेग देण्याची गरज असल्याचे डाॅ. पाटील यांनी सांगितले.   

आठवडी बाजाराच्या माध्यमातून किती  रोजगार निर्माण झाला याची नेमकी आकडेवारी सांगता येणार नाही. परंतु शेतकरी गट अाणि शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून उभारण्यात येणाऱ्या स्टाॅलमुळे ग्रामीण भागातील युवकांना रोजगार मिळत अाहे. भाजीपाला विक्रीसाठी लागणारे वाहन, त्यासाठी लागणारे चालक, स्टाॅलमधील किरकोळ विक्रीमुळे रोजगार उपलब्ध हाेत असल्याचे त्यांनी सांगितले.  

मुंबईच्या महाराष्ट्र विधान भवन परिसरात एकूण १६ स्टाॅल लावले जातात. विधान भवनाच्या पार्किंग परिसरास सलग ५२ आठवडे शेतकरी आठवडी बाजार भरत असून वर्षभरात या ठिकाणी १२ लाख ३७ हजार मेट्रिक टन भाजीपाला व फळांची विक्री हाेऊन ७ काेटी ५४ लाख २५ हजार रुपयांची उलाढाल झाल्याचे विधान भवन शेतकरी आठवडी बाजाराचे समन्वयक मधुकर कांगणे यांनी सांगितले.   
बातम्या आणखी आहेत...