आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जीएसटी पोर्टलवर गडबड, एका व्यापाऱ्याने लॉगइन केल्यानंतर दुसऱ्याचेच खाते उघडले

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- जीएसटी लागू होऊन अजून दोन आठवडेही झाले नाही, तर जीएसटीच्या पोर्टलवर गडबडी असल्याचे समोर आले आहे. पोर्टलवर लॉगइन करण्यासाठी व्यापाऱ्यांनी सविस्तर माहिती भरल्यानंतर दुसऱ्याच व्यापाऱ्याचे खाते उघडत असल्याची तक्रार काही व्यापाऱ्यांनी केली आहे. यामुळे व्यापाऱ्यांना आपला डाटा लीक होण्याची भीती वाटत आहे. दुसऱ्याचे खाते दिसणे शक्य नाही, असा दावा सरकारने  जीएसटी लागू होण्याआधी केला होता.  

असे असले तरी यासाठी चार्टर्ड अकाउंटंट जबाबदार असल्याचे कर विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. टॅक्स प्रॅक्टिशनर्स एकाच वेळी अनेक कंपन्यांचे खाते उघडतात, त्यामुळे असे होत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. जीएसटी लागू करणाऱ्या सीबीईसीच्या मुंबई विभागीय कार्यालयाने यासंबंधी एक परिपत्रक जारी केले आहे. एकाच सीएने नोंदणी केलेल्या खातेदारांमध्येच असे प्रकार दिसत असल्याचे यात म्हटले आहे. विशेष म्हणजे जुन्या व्यापाऱ्यांची नावे जीएसटीएनवर नोंदवण्यासाठी सरकारने २२ जुलैपर्यंत आणि नवीन नोंदणीसाठी ३० जुलैपर्यंतची वेळ दिलेली आहे. जर एखाद्या कंपनी किंवा व्यापाऱ्याला एकाच पॅनवर वेगवेगळ्या वर्टिकलसाठी स्वतंत्र नोंदणी करायची असेल, तर त्यांनी स्वतंत्र ई-मेल आयडी अाणि मोबाइल क्रमांकाचा वापर करावा. यामुळे नोंदणी क्रमांक युनिक राहील. 

सीएच्या चुकीमुळे अडचणी
टॅक्स प्रॅक्टिशनर्स (सीए) आपल्या कॉम्प्युटरवर वेगवेगळ्या करदात्यांसाठी (व्यापारी) अनेक विंडो उघडून ठेवतात त्यामुळेच असे होते. अर्ज भरताना जी आकडेवारी भरली जाते, ती कॉम्प्युटरच्या कॅश मेमरीमध्ये राहून जाते. यामुळेच ही अडचण येते. 

एका वेळी एकाच व्यापाऱ्याची विंडो उघडा  
सीबीईसीने सीएना सल्ला दिला आहे की, त्यांनी एका वेळी एकाच व्यापाऱ्याची  विंडो उघडावी. त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर कॉम्प्युटरची कॅश मेमरी डिलिट करावी. त्यानंतरच दुसऱ्या व्यापाऱ्याच्या नोंदणीसाठी एनरोलमेंटची प्रक्रिया सुरू करावी.
बातम्या आणखी आहेत...