आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अतिश्रीमंतांना आवडते विदेशात मालमत्ता घेणे, आंतरराष्ट्रीय संस्थांचा अहवाल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - भारतासह जगभरातील विकसनशील देशांतील अतिश्रीमंत व्यक्ती स्वत:चे दुसरे घर विदेशात बनवणे पसंत करतात. एका अहवालानुसार, जवळपास १२ टक्के अतिश्रीमंत नागरिकांनी स्वत:चे दुसरे घर खरेदी केलेले आहे. येत्या काळात या आकडेवारीत आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

"वेल्थ-एक्स आणि सॉदबी' या आंतरराष्ट्रीय संस्थेने हा अहवाल तयार केला आहे. या अहवालानुसार, ब्रिक्स देशांमधील (ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण अफ्रिका) अतिश्रीमंत नागरिकांना विदेशात आपली स्वत:चे लक्झरी घर असावे असे वाटते. असे व्यावसायिक आवश्यकतेबरोबरच बाजारात होत असलेली चढ-उतार आणि राजकीय घडामोडींपासून संरक्षण मिळावे यासाठी केले जाते.

यामधील निवासी मालमत्ता खरेदीमध्ये एका वर्षात ८.३ टक्के वाढ झाली आहे. २०१५ च्या दुसऱ्या सहा महिन्यांत यामध्ये ११५.२ नेे वाढ नोंदवण्यात आली आहे. आलिशान घर खरेदी करण्याविषयी विश्वास वाढत असल्याने यामध्ये सलग वाढ होणे अपेक्षित असल्याचेही या अहवालात नमूद करण्यात आले आहे.
अहवालात अतिश्रीमंत व्यक्तीची व्याख्या
या अहवालात ज्या व्यक्तींकडे कमीत कमी तीन कोटी डॉलर म्हणजेच २०० कोटी रुपयांची मालमत्ता आहे अशा नागरिकांना अतिश्रीमंत व्यक्ती मानण्यात आले आहे.

जगभरात २ लाखांपेक्षा जास्त अतिश्रीमंत
जगभरात २ लाख ११ हजार २७५ अतिश्रीमंत व्यक्ती आहेत. वेल्थ-एक्स आणि यूबीएसच्या २०१४ च्या अहवालानुसार या सर्व व्यक्तींची एकूण मालमत्ता ३० लाख कोटी डॉलर (जवळपास २,००० लाख कोटी रुपये) आहे.