आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सरकारी बँकांत मिळतो कनिष्ठांना जास्त पगार : रघुराम राजन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - सरकारी बँकांत वरिष्ठ पातळीवरील कर्मचाऱ्यांपेक्षा कनिष्ठ पातळीवरील कर्मचाऱ्यांना जास्त पगार मिळतो. यामुळे वरिष्ठ पदांवर चांगल्या व्यक्ती आणणे अवघड होऊन बसते, असे मत भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी व्यक्त केले.

मंगळवारी मुंबईत आयोजित बँकांच्या वार्षिक संमेलनात मार्गदर्शन करताना ‘मलादेखील कमी पैसे मिळतात,’असेही राजन गमतीशीरपणे सांगितले. जुलैच्या आकडेवारीनुसार राजन यांना एकूण १,९८,७०० रुपये मिळाले होते. राजन यांनी खासगी बँकांप्रमाणे सरकारी बँकांतही इसॉप देण्याचा सल्ला दिला.

सरकारी खासगी बँकांच्या वार्षिक अहवालातून त्यांच्या प्रमुखांच्या पगारातील तफावत कळते. एसबीआय प्रमुख अरुंधती भट्टाचार्य यांना २०१५-१६ मध्ये फक्त ३१.१ लाख रुपये मिळाले. याउलट एचडीएफसी बँकेचे एमडी आदित्य पुरी यांना ३० पट जास्त म्हणजे ९.७ कोटी रुपये मिळाले. रिझर्व्ह बँकेत तृतीय श्रेणीतील कर्मचाऱ्यांचा पगारदेखील खूप चांगला असल्याचे राजन यांनी सांगितले.

त्यामुळेच अनेक अभियंता आणि एमबीए झालेले उमेदवारदेखील या पदासाठी अर्ज करतात. ही त्यांच्यासाठी मोठी संधी असते. आम्ही त्यांना सांगतो, तुम्ही इथे फक्त कारकुनाचे काम करण्यासाठीच नाही आहात. तुमच्याकडून मोठ्या अपेक्षा आहेत. राजन म्हणाले, वरिष्ठ पदांवरील भरती महत्त्वाची आहे. मात्र, केडरच्या समस्येमुळे सरकारी कंपन्या त्या टाळतात. कोर्टाच्या निकालांमुळेही बँका खास कॅम्पस भरती करू शकत नाहीत. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ बँक मॅनेजमेंट सरकारी मदतीवर चालते. पण येथून उत्तीर्ण होणारे बहुतांश उमेदवार खासगी बँकांत काम करण्यास पसंती देतात. बँकांना स्थानिक पातळीवर भरतीसाठी खास मुभा मिळाली पाहिजे, असेही राजन यांनी सांगितले.
बातम्या आणखी आहेत...