आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पन्नास काेटींवरील व्यवसायांना ‘सेटअप’,एलबीटीबाबत नव्या धाेरणाचे संकेत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- राज्य सरकारने १ अाॅगस्टपासून पन्नास काेटींखालील उलाढाल असलेल्या व्यवसायांना स्थानिक संस्था करातून (एलबीटी) मुक्त केल्यानंतर अाता एलबीटीमध्ये व्हॅट या कराच्या धर्तीवर पन्नास काेटींवरील उलाढाल असलेल्यांना ‘सेटअप’ देण्यासाठीचे धाेरण लवकरच येणार अाहे. याबाबतचे संकेत मुख्यमंत्र्यांनीच मंगळवारी मंत्रालयात उद्याेजकांच्या बैठकीत दिल्याने उद्याेग जगतात समाधान व्यक्त केले जात अाहे.

भारतीय जनता पक्षाने निवडणुकीत दिलेल्या अाश्वासनानुसार एलबीटी रद्द केला खरा; पण अंशत: ताे कायम अाहे. पन्नास काेटींवर वार्षिक उलाढाल असलेल्या व्यावसायिकांना हा कर भरावाच लागणार असल्याने असंताेषाची ठिणगी धगधगते अाहे.
अांदाेलनाची तयारीही सुरू असून भाजपने शब्द फिरवल्याची भावनाही व्यक्त केली जात अाहे. राज्यात नाशिकमधील उद्याेगांनाच एलबीटी कायम राहिल्याचा माेठा फटका सहन करावा लागणार असल्याने उद्याेग स्थलांतरित हाेतात की काय, अशी भीतीही उद्याेग जगतात व्यक्त हाेत अाहे. याच अनुषंगाने नाशिकच्या उद्याेजक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांशी भेट घेऊन चर्चा केली. त्यात हा विषय चर्चिला गेला असता, याप्रकारे सेटअप दिला जाण्याकरिता प्रक्रिया सुरू असून लवकरच याबाबत निर्णय हाेईल अाणि पन्नास काेटींवर उलाढाल असलेल्या व्यावसायिकांनाही दिलासा देण्याचे काम शासन करेल, असे मुख्यमंत्र्यांनी या वेळी स्पष्ट केले.