आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Figures Released By The Department Of Agriculture

रब्बीचे उत्पादन घटून महागाईचे चटके बसणार, 18.48 लाख हेक्टरात पेरणी कमी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - या वेळी आतापर्यंतच्या रब्बी हंगामात १८.४८ लाख हेक्टर क्षेत्रात पेरणी कमी झाली आहे. पिकांची वाढ न होणे व उत्पादन कमी होण्याच्या शक्यतेत गहू, डाळी व तेलबियांचे भाव वाढू शकतात. येत्या १५ दिवसांत वातावरणात थंडी न पडल्यास उत्पादनात घट येऊ शकते. गेल्या सहा वर्षांत या वेळचा हिवाळा ऋतू सर्वांत उष्ण आहे. हवामान तज्ज्ञांनुसार, येत्या १५ दिवसांत कडाक्याची थंडी पडण्याची शक्यता कमी आहे. यामुळे गहू, हरभरा आणि मोहरी यांसारख्या पिकांचा दाणा पिचका राहील. त्यामुळे पिकाच्या गुणवत्तेसोबत उत्पादनही कमी होईल. सध्या पिकांच्या किमतीबाबत काहीही बोलणे घाईचे ठरेल.

कृषितज्ज्ञ देवेंद्र शर्मा म्हणाले, सलग तिसऱ्या वर्षी गहू आणि रबी पिकांची पेरणी घटली आहे. १५ जानेवारीनंतर आता पेरणी जवळपास पूर्ण झाली आहे. अनेक ठिकाणी पेरणीयोग्य पाऊस झाला नव्हता. ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये शेतात कमी ओल होती. उत्पादनात घट होण्याची स्थिती चिंताजनक आहे. सरकारकडे २३० लाख मेट्रिक टन गव्हाचा साठा असल्यामुळे या पिकाबाबत चिंताजनक स्थिती नाही. गव्हाचा बोनस कमी करण्यात आला आहे. बराच साठा असल्यामुळे गव्हाचे उत्पादन कमी व्हावे, असे सरकारला वाटते. कदाचित हवामानही सरकारला यासाठी मदत करत आहे.
कृषी विभागाने प्रसिद्ध केलेल्या आकड्यानुसार १५ जानेवारीपर्यंत देशात ५७७.३ लाख हेक्टर क्षेत्रात पेरणी झाली होती. गेल्या वर्षी या कालावधीत हा आकडा ५९५.७८ लाख हेक्टर होता. गव्हाची पेरणी गेल्या वर्षीच्या तुलनेत १५ लाख हेक्टर कमी झाली. डाळीचे क्षेत्र ३.५ लाख हेक्टर आणि तेलबियांचे क्षेत्र ३ लाख हेक्टर कमी झाले. इंडियन काैन्सिल आॅफ अॅग्रिकल्चर रिसर्चचे (आयसीएआर) महासंचालक डॉ. एस. अयप्पन म्हणाले, देशातील बहुतांश भागात पेरण्या झाल्या आहेत. आता केवळ दुष्काळात तग धरू शकणाऱ्याच पिकांची पेरणी होऊ शकेल. कमी पेरणी क्षेत्रामुळे उत्पादन घटेल, मात्र ते किती असेल हे आगामी १५ दिवसांचे हवामान ठरवेल.
सहायक प्रो. जे. एस. महेरिया म्हणाले, थंडी कमी पडल्यास गहू, वाटाणा, हरभरा आणि मोहरीसारख्या पिकांचा दाणा चांगला भरणार नाही. शेतात ओल नसल्यामुळे पेरणीनंतरही चांगले उगवले नाही. त्यामुळे कमी पावसावर येणाऱ्या पिकांची जास्त पेरणी करण्यात आली.
पुढील स्‍लाइडवर वाचा, रब्बीतील पेरणीची स्थिती..