नवी दिल्ली - फॉरेन इन्व्हेस्टमेंट प्रमोशन बोर्ड (एफआयपीबी) ने शुक्रवारी संध्याकाळी सिस्तेमा टेलिसर्व्हिसेस आणि आयआयएफएल होल्डिंग्जसह १४ विदेशी गुंतवणूकदारांच्या प्रस्तावांना मंजुरी दिली आहे, तर २३ प्रस्ताव विचाराधीन ठेवण्यात आले असून ४ प्रस्ताव नामंजूर करण्यात आले आहे. अर्थ सचिव शक्तिकांता दास यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या एफआयपीबी बाेर्डाच्या बैठकीत २३ प्रस्तावांवर चर्चा करण्यात आली. यातील पाच प्रस्तावांवरील निर्णय टाळण्यात आला आहे, तर चार प्रस्ताव रद्द करण्यात आले आहेत. एफआयपीबीने इरोज इंटरनॅशनल मीडिया, इंडियन रोटोरक्राफ्ट, एजीएस ट्रान्सॅक्ट टेक्नॉलॉजीज आणि ओ-जोन नेटवर्क्सच्या विदेशी गुंतवणुकीच्या प्रस्तावांना मंजुरी दिली आहे. रिलायन्स ग्लोबलकॉम, फायरफ्लाय नेटवर्क्स, अपोलो हॉस्पिटल्स आणि एगॉन रेलिगेयर लाइफ इन्शुरन्सचे प्रस्ताव टाळण्यात आले आहेत.