म्युच्युअल फंड म्हणजे शेअर बाजारातील गुंतवणूक अशी एक धारणा आहे. पण समभागांमधील गुंतवणुकीपल्याड अन्य अनेक गुंतवणूक पर्याय म्युच्युअल फंडांकडून वापरात येतात. त्यापैकी एक वैविध्य म्हणजे डेट फंड होय. आज बहुतांश गुंतवणूकदारांबाबत त्यांच्या पूर्वीचा विश्वासू सोबती असलेल्या मुदत ठेवींचा (एफडी) जागा या डेट फंडांनी घेतली आहे. अर्थात एफडीप्रमाणे काही सारखी वैशिष्ट्ये असली तरी डेट फंडांचे काही अतिरिक्त फायदेही आहेत. म्हणूनच त्याचे दोहोंच्या तुलनेत पारडे जड आहे सोप्या शब्दांत सांगायचे तर, डेट फंड हे वेगवेगळ्या कर्जरोखे आणि ऋणपत्रातील (बाँड, डिबेंचर्स, सिक्युरिटीज्) गुंतवणुकीचे एकगठ्ठा भांडार (पोर्टफोलियो) असतात. एका फंडाच्या पोर्टफोलियोतील रोखे हे सरासरी सारख्या मुदतीचे आणि पत धारणा असलेले असतात. डेट फंडातील गुंतवणूकदारांनी लक्षात घ्यावयाचे महत्त्वाचे सूत्र म्हणजे व्याजाचा दरांच्या हालचालीच्या नेमकी विरुद्ध दिलेल्या रोख्यांच्या (बाँड्सच्या) किमतीची दिशा असते. म्हणजे जर बँकांचे व्याजाचे दर खाली येत असतील, तर बाँड्सच्या किमती वाढत जाताना दिसतील आणि तसेच उलटही घडताना दिसून येईल. तर बाँड्सच्या किंमत हालचाल ही त्या फंडाच्या पोर्टफोलियात समाविष्ट रोख्यांच्या सरासरी मुदतीशी (मॉडिफाइड ड्युरेशन) नजीकचा संबंध असतो. म्हणजे डेट फंडाच्या पोर्टफोलियोतील रोख्यांची सरासरी मुदत जितकी जास्त तितकी व्याजदरात चढ-उताराप्रमाणे बाँड्सची किंमत हालचाल आपल्याला पाहायला मिळेल आणि अल्पमुदतीच्या रोख्यांबाबत हेच उलट घडताना दिसेल. यामुळेच डेट फंडांतील मिळणाऱ्या परताव्याचेही दोन प्रकार आहेत. पहिले म्हणजे यील्ड अर्थात दृश्य स्वरूपातील लाभ आणि दुसरे म्हणजे व्याज दरातील चढ-उतार आणि सरासरी (दीर्घ वा अल्प) मुदतीप्रमाणे फंडाच्या नक्त मालमत्ता मूल्यात (एनएव्ही) होणाऱ्या बदलाच्या आधारे मार्क टू मार्केट लाभ वा तोटा होय.
पुढील स्लाइड्सवर वाचा, अल्प व्याजदर काळात डेट फंड गुंतवणूक.... फायद्याचा व्यवहार.... निवड कशी कराल... डेट फंडांची कर कार्यक्षमता ... स्थिर परताव्याचा विकल्प