आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Flipkart Calls Off Deal With Airtel Zero To Support Net Neutrality News In Marathi

\'नेट न्यूट्रॅलिटी\': सोशल मीडियासमोर झुकले FLIPKART, Airtel Zero शी फारकत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- 'नेट न्यूट्रॅलिटी'चा सकारात्मक प्रभाव दिसू लागला आहे. नेटिजन्ससमोर ई कॉमर्स कंपनी 'फ्लिपकार्ट'ने अक्षरश: झुकले आहे. 'फ्लिपकार्ट'ने 'एअरटेल ‍झीरो'सोबत केलेला करार रद्द केला आहे. सोशल मीडियावरील नेेटिजन्सचा वाढता विरोध पाहून 'नेट न्यूट्रॅलिटी'ला सपोर्ट करण्यासाठी 'फ्लिपकार्ट'ने हे पाऊल उचलले आहे. परंतु. फ्लिपकार्टचा हा निर्णय भारती एअरटेलसाठी मोठा धक्का मानला जात आहे.
'फ्लिपकार्ट' ने भारती एअरटेलसोबत एक करार केला होता. एअरटेल झीरोच्या प्लटफॉर्मवर फ्लिपकार्टच्या अॅपसाठी विशेष तरतुद करण्यात आली होती. परंतु, या करारामुळे नेटिजन्स नाराज झाले होते. या करारामुळे 'नेट न्यूट्रॅलिटी'च्या नियमांचे उल्लंघन झाल्याचे युजर्सनी म्हटले होते. त्यामुळे फ्लिपकार्टने एअरटेलसोबतचा करार रद्द केल्याची अधिकृत घोषणा केली आहे.

'फ्लिपकार्ट'ने केली अधिकृत घोषणा...
स्वत:ला एअरटेलच्या झिरो प्लानमधून वेगळ करतांना फ्लिपकार्टने म्हटलं आहे,
'फ्लिपकार्ट'ने 'नेट न्यूट्रॅलिटी'वर विश्वास असल्याचे सांगत स्वत:ला एअरटेलच्या झिरो प्लानमधून वेगळ केल्याची अधिकृत घोषणा केली आहे. आम्ही डिजिटल युगात स्वत:चे स्थान निर्माण केले आहे. आम्हाला नेटिजन्सचा विश्वास गमवायचा नस्लयाचे फ्लिपकार्टच्या सुत्रांनी म्हटाले आहे.

काय आहे वादचे कारण...
भारती एअरटेलने मोफत इंटरनेट प्लान 'एअरटेल झीरो' लॉन्च केला. फ्लिपकार्टने या प्लानसाठी एअरटेलसोबत एक करार केला होताे. या प्लाननुसार ग्राहक कोणताही डेटाचार्ज न खर्च करता अॅप्लिकेशन्स वापरू शकतो. मात्र, ग्राहकाला एअरटेलसोबत रजिस्टर्ड असलेल्या अॅप्लिकेशन्सचा करता येत होत्या. जी वेबसाइट अथवा अॅप एअरटेलसोबत रजिस्टर्ड नसलेल्या
वेबसाईट्‍स तसेच अॅप ग्राहकाला वापरता येत नव्हत्या.
फ्लिपकार्ट ही या प्लानमध्ये रजिस्टर असणारी पहिली ई कॉमर्स कंपनी होती, मात्र, एअरटेल झिरोसोबत करार केल्यापासून युझर्स 'फ्लिपकार्ट'चे रेटिंग कमी करत असल्याचे दिसून आल्यामुळे हा करार रद्द केला आहे.
दुसरीकडे, गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर 'नेट न्यूट्रॅलिटी'च्या चर्चेने जोर धरला आहे. 'नेट न्यूट्रॅलिटी' ही मोहीम सुरु राहावी, यासाठी जवळपास 2 लाख नेटिजन्स एकत्र आले आहेत. याबाबत लवकरच निर्णय घेतला जाणार असल्याचे केंद्रीय दूरसंचारमंत्री रविशंकर प्रसाद यांनी सांगितले. 'नेट न्यूट्रॅलिटी' किंवा 'इंटरनेट' तटस्थतेचे बाजूने निर्णय होणार असल्याचे संकेतही प्रसाद यांनी यावेळी दिले आहेत.

पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा, 'नेट न्यूट्रॅलिटी' म्हणजे काय?