आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या तरुणाने 10 हजारांत सुरु केला होता बिझनेस; आज खरेदी केलाय 32 कोटींचा बंगला

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- ऑनलाइन शॉपिंग साइट 'फ्लिपकार्ट'चे सीईओ व को-फाउंडर बिन्नी बन्सल सध्या चर्चेत आहेत. 32 वर्षीय यंग बिझनेसमनने बंगळुरुमध्ये 32 कोटी रुपयांचा एक आलिशान बंगला खरेदी केला आहे. तुम्हाला कदाचित माहीत नसावे की, बिन्नी यांनी केवळ 10 हजार रुपयांत आपला बिझनेस सुरु केला होता.

अब्जाधीश बिझनेसमन्सचा झाला शेजारी...
- बंगळुरुमधील टेक हब कोरामंगला येथे बिझनेसमन्सचे आलिशान बंगले आहेत.
- कोरामंगलाच्या तिसर्‍या ब्लॉकमध्ये इन्फोसिसचे को-फाउंडर नंदन निलेकणी, कृष्ण गोपालन, डॉ.देवी सेट्टी व राजीव चंद्रशेखर सारख्या नामी बिझनेसमन्स राहातात. आता याबिझनेसमन्सच्या यादीत बिन्नी यांचेही नाव आले आहे.
- बिन्नी यांनी बंगला घेतला आहे. त्याच ठिकाणी नऊ वर्षांपूर्वी आपला बिझनेस सुरु केला होता.
- बन्सल यांनी हा बंगला खरेदी करण्यासाठी दोन खासगी बॅंकांकडून कर्ज घेतले आहे.
- बन्सल यांचा हा बंगला दस हजार स्क्वेअर फूट जागेत बांधण्यात आला आहे.

10 हजार रुपयांत सुरु झाली कंपनी...
- इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, दिल्ली येथून पदवी घेतल्यानंतर सचिन व बिन्नी या दोघांनी ऑक्टोबर 2007 मध्ये 'फ्लिपकार्ट' कंपनी सुरु केली.
- सुरुवातीला कंपनीचे नाव 'फ्लिपकार्ट ऑनलाइन सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड' असे होते. कंपनी केवळ बुक्स सेलिंगचे काम करत होती.
- सचिन व बिन्नीने कंपनी सुरु करण्‍यापूर्वी 'अमेजन डॉट कॉम'मध्ये काम केले होते.
- सचिन व बिन्नीने केवळ 10 हजार रुपयांनी ही कंपनी सुरु केली होती. आज कंपनीचा बिझनेस 1 बिलियन डॉलर (जवळपास 6100 कोटी रुपये) वर पोहोचला आहे.

काय विकते 'फ्लिपकार्ट':
- 'फ्लिपकार्ट'वर गॅजेट्ससोबतच इलेक्ट्रॉनिक, होम अप्लायन्स, क्लॉथ, किचिन अप्लायन्स, ऑटो अॅण्ड स्पोर्ट्स एक्सेसरीज, बुक्स अॅण्ड मीडिया, ज्वेलरीसोबत इतर प्रॉडक्ट विक्रीसाठी उपलब्ध आहेत.
- बहुतांश प्रॉडक्ट्सवर बिग डिस्काउंट दिला जातो.

पुढील स्लाइड्सवर पाहा, या युवा अब्जाधीश बिझनेसमनचे निवडक फोटोज...
बातम्या आणखी आहेत...