आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

\'फ्लिपकार्ट\'च्या मालकांनी घरोघरी जाऊन दिली डिलिव्हरी, तरुणी म्हणाली, नंतर या!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चंदीगड- 'फ्लिपकार्ट'चे चेअरमन-को फाउंडर सचिन बन्सल यांनी शुक्रवारी सकाळी चंदीगडमध्ये स्वत: कस्टमर्सच्या घरी जाऊन ऑर्डर डिलिव्हर केली. काही ग्राहकांंनी तर त्यांना ओळखलेही नाही. सचिन, एका तरुणीकडे तिची ऑर्डर डिलिव्हर करण्यासाठी गेले असता ती म्हणाली, 'नंतर या, कॉलेजला जायला उशीर होतोय.'

सत्य कळल्यानंतर तरुणीला बसला आश्चर्याचा धक्का...
- मनीषा नामक तरुणीने सांगितले की, तिच्या आईने 'फ्लिपकार्ट'च्या बिग बिलियन ऑफरमध्ये तिच्यासाठी एक कुर्ता ऑर्डर केला होता. सकाळी ती कॉलेजला निघाली होती. तितक्यात दारावर बेल वाजली. तिने दरवाजा उघडला.
- 'फ्लिपकार्ट'चा डिलिव्हरीमन गेटवर उभा असल्याचे तिने पाहिले. डिलिव्हरीमनच्या डोक्यात कॅप होती. 'नंतर या. कॉलेजला जायला उशीर होतोय', असे मुलीने सांगितले. पण गेटवर उभा असलेला डिलिव्हरीमन हे 'फ्लिपकार्ट'चे एक्झिक्युटीव्ह चेअरमन आणि मालक सचिन बन्सल असल्याचे तिला समजल्यानंतर आश्चर्याचा धक्काच बसला.
- मनीषाने सचिन बन्सल यांच्यासोबत संवाद साधला. मनीषा एसडी कॉलेजची बीएस्सीची विद्यार्थिनी आहे.

हे सीईओ देखील घेतात कस्टमर्सची भेट...
- प्रॉक्टर अॅण्ड गॅम्बलचे (P&G) सीईओ ए.जी. लाफले हे नेहमी आपल्या कस्टमर्सची भेट घेतात. आपल्या प्रॉडक्सविषयी त्यांचे म्हणणे ऐकूण घेतात. त्यानंतर कंपनीच्या आर अॅण्ड डी टीमसोबत चर्चा करून सुधारणा सुचवतात.
- यूकेमधील प्रमुख सुपरमार्केट चेन 'टेस्को'चे सीईओ टेरी लीहे हे देखील आठवड्यातील दोन दिवस स्टोअर्समध्ये थांबून ग्राहकांशी संवाद साधतात. त्यांची मागणी लक्षात घेतात.
- यूकेमधील व्हर्जिन ग्रुपचे चेअरमन रिचर्ड ब्रॉन्सन हे स्वत: एअरलाइन्सच्या प्रवाशांसोबत संवाद साधतात. त्यांच्या समस्या जाणून घेतात आणि सेवेत सुधारणा करतात. ते क्रू मेंबर्ससोबत काम करण्यातही ते मागेपुढे पाहाता नाहीत.

पुढील स्लाइड्सवर वाचा, कस्टमरने चहा ऑफर केल्यावर काय म्हणाले बन्सल....
बातम्या आणखी आहेत...