आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आता Flipkart वरूनही बुक करता येईल रेल्वे, बस आणि विमान तिकिट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बंगळुरु- देशातील अग्रेसर ई-कॉमर्स कंपनी Flipkart आपल्या युजर्ससाठी ऑनलाइन तिकिट बुकिंग सर्व्हिस सुरु करणार आहे. Flipkart यंदा आपल्या वेबसाइटवर अनेक नव्या सर्व्हिस सुरु करणार आहे. त्यात ई-टिकट सर्व्हिसचा समावेश आहे. ई-टिकट सर्व्हिससाठी Flipkart ट्रॅव्हल वेबसाइट 'मेकमायट्रिप'सोबत येत्या सप्टेंबरमध्ये करार होणार आहे. युजर्सला Flipkartच्या वेबसाइटवरून थेट रेल्वे, बस आणि विमान तिकिट बुक करता येणार आहे.

भविष्यात सर्व कॅटिगरीमधील रिटेलर्ससोबत पार्टनरशिप करण्याचा आमचा विचार आहे. प्रत्येक शॉपरसाठी Flipkart वेबसाइट एक 'वन-स्टॉप-डेस्टिनेशन' म्हणून पुढे येईल, असा आमचा प्रयत्न राहील, असे कंपनीचे हेड ऑफ कॉमर्स मुकेश बंसल यांनी सांगितले.

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून वाचा, Amazonने देखील रेल्वे तिकिट बुकिंग सर्व्हिसची घोषणा...
बातम्या आणखी आहेत...