आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

देशातील काळ्या पैशाची अर्थव्यवस्था आता बंद करा, जेटलींच्या अधिकाऱ्यांना सूचना

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - देशात काळ्या पैशाची समांतर अर्थव्यवस्था बंद झाली पाहिजे. त्यासाठी सरकार कडक पावले उचलणार आहे. मात्र, त्याचबरोबर नियमित कर भरणाऱ्यांना घाबरण्याची गरज नसून त्यांच्यासाठी आणखी सोयी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सांगितले. अधिकाऱ्यांनी काळ्या पैशाची अर्थव्यवस्था बंद करण्याचेही त्यांनी या वेळी सांगितले. सीबीडीटीच्या वार्षिक संमेलनात मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

विदेशात काळा पैसा जमा करणाऱ्यांवर त्यांनी कडाडून टीका केली आणि नव्या कायद्याचे कडक पालन करण्याचा सल्ला अधिकाऱ्यांना दिला. कराच्या रूपात जमा होणाऱ्या पैशातून सरकार सामाजिक आणि मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी खर्च करते. त्यातून वैयक्तिक करदात्यांनाही सूट देता येऊ शकते. त्यामुळे सर्वांनी नियमित कर भरण्याचा सल्ला अर्थमंत्र्यांनी दिला.

करात १४ ते १५ टक्के वाढ
चालू आर्थिक वर्षात करसंकलनात १४ ते १५ टक्के वाढ होण्याची आशा जेटली यांनी व्यक्त केली. तसेच वित्तीय तूट ३.९ टक्क्यांपेक्षा कमी राहण्याची शक्यताही त्यांनी वर्तवली. मात्र, वित्तीय तूट कमी करण्यापेक्षा सामाजिक क्षेत्रातील योजनांवर खर्च करण्यावर आपला भर असल्याचे जेटली यांनी सांगितले. ते म्हणाले की, काळ्या पैशाच्या समस्येवर मार्ग काढण्यासाठी सरकार आणखी काही कडक पावले उचलणार आहे. त्याचाच भाग म्हणून काळ्या पैशाचा कायदा मंजूर करण्यात आला आहे. तसेच देशांतर्गत बेकायदा सौदे थांबवण्यासाठी नवीन बिल सादर करण्यात येणार आहे.

काळ्या पैशाचा शोध
महसूल सचिव शक्तिकांत दास यांनी चालू आर्थिक वर्षात प्रत्यक्ष करांच्या माध्यमातून ७.९८ लाख कोटी रुपये जमा करण्याचे लक्ष्य असल्याचे सांगितले. सरकार देशात असलेला काळा पैसा, मालमत्ता यांचा शोध घेण्यासाठी प्रयत्न करत आहे. याव्यतिरिक्त फसवणूक करून पैसा कमावणाऱ्यांवर बारीक नजर ठेवण्यात येत आहे. तसेच विदेशातील काळ्या पैशाबाबत ३१ मार्चच्या आधी सर्व प्रक्रिया पूर्ण होण्याची आशादेखील दास यांनी व्यक्त केली.
बातम्या आणखी आहेत...