आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Food Inflation Can’t Be Tamed; Spiral Effect Should Be: Raghuram Rajan

अन्नधान्य महागाई कमी करू शकत नाही रिझर्व्ह बँक : राजन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - रिझर्व्ह बँक खाद्यपदार्थांची महागाई कमी करू शकत नाही. मात्र, महागाई नियंत्रणाचा परिणाम इतर वस्तूंच्या महागाईवर होऊ नये, असा प्रयत्न असल्याचे रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी सांगितले. गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्स येथे ते बोलत होते.

राजन म्हणाले, खाद्य महागाईवर रिझर्व्ह बँक नियंत्रण मिळवू शकत नाही. लोकांना अन्न लागतेच. मात्र, काय खायचे हे ते स्वत: ठरवतील. पुरवठ्याच्या बाजूने महागाई वाढत असेल तर त्यासाठी रिझर्व्ह बँक काही करू शकत नाही. पतधोरणाचा पुरवठा चक्रावर परिणाम होणार नाही याची काळजी घेतली जाते. इतरही अनेक घटक आहेत जे सुलभरीत्या नियंत्रित करता येतात.

किमतीवर लक्ष
अवकाळी पाऊस तसेच खराब मान्सूनमुळे खाद्यपदार्थ महागतात व नंतर रिझर्व्ह बँक व्याजदरात वाढ करते, ही धारणा चुकीची असल्याचे राजन यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले, महागाई नियंत्रणासाठी आम्ही दोन वर्षांचा कालावधी निश्चित केला आहे. या काळात अल्पकाळासाठी अन्नधान्य महागाई वाढल्यास काळजीचे कारण नाही. मात्र, इतर वस्तूंच्या किमती वाढणार नाहीत, असा प्रयत्न राहील.

पूर्ण परिवर्तनीयता लागू करण्यावर विचार
राजन यांनी सांगितले, भांडवली खात्यांची पूर्ण परिवर्तनीयता लागू करण्याबाबत रिझर्व्ह बँक विचार करत आहे. यासाठी काही वर्षे लागू शकतात. पूर्ण परिवर्तनीयता म्हणजे विदेशी गुंतवणूकदारांना भारतातून आपला पैसा स्वत:च्या चलनात नेण्याची परवानगी राहील. देशात १९९१ मध्ये उदारीकरण सुरू झाल्यानंतर रिझर्व्ह बँक सातत्याने भांडवलावरील नियंत्रण कमी करत आहे. आता केवळ कमी कालावधीसाठी निधीवर नियंत्रण राहिले आहे. मात्र, या नियंत्रणामुळेच भारत मागील आर्थिक संकटातून वाचण्यात यशस्वी ठरला आहे.