आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विदेशी गुंतवणूकदारांमध्ये उत्साह संचारला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- जागतिक बाजारातील सकारात्मक वातावरण आणि विदेशी गुंतवणुकीच्या नियमांमध्ये शिथिलता आणण्याचा केंद्र सरकारने घेतलेला निर्णय यामुळे विदेशी गुंतवणूकदारांमध्ये उत्साह संचारला आहे.

या गुंतवणूकदारांनी जुलै महिन्यात भांडवल बाजारात केलेली निव्वळ गुंतवणूक एक अब्ज डाॅलरच्या वर म्हणजे साडेसहा हजार काेटी रुपयांवर गेली अाहे. विशेष म्हणजे गेल्या दाेन महिन्यांत माेठ्या प्रमाणावर निधी बाजारातून बाहेर गेल्यानंतर अाता ते पुन्हा सक्रिय झाले अाहेत. विदेशी गुंतवणूकदारांकडून जुलै महिन्यात समभागांमध्ये ४,९५३ काेटी रुपयांची, तर कर्ज बाजारपेठेत १,५४७ काेटी रुपयांवर गुंतवणूक झाली अाहे. त्यामुळे एकूण गुंतवणूक ६,५०० काेटी रुपयांची झाली अाहे. जून महिन्यात याच गुंतवणूकदारांनी भांडवल बाजारातून १,६०० काेटी रुपयांचा निधी काढून घेतला हाेता.
बातम्या आणखी आहेत...