आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Franchises Give Match Fee 6000 To 12000 Rs According To Contract And Bonus On Win.

चीअरलीडर्सवर आश्रित आहे IPLचा ग्लॅमर; जाणून घ्या किती होते कमाई

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्‍ली- IPLचा ग्लॅमर वाढवण्यामध्ये चीअरलीडर्स महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडत असतात. प्रत्येक लढतीदरम्यान चौकार, षटकार व विकेटवर चीअरलीडर्स डान्स करून प्रेक्षकांचे मनोरंजन करतात. प्रेक्षक क्रिकेटसोबत चीअरलीडर्सच्या ग्लॅमरमध्ये आकर्षित होतात. IPL दरम्यान प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी चीअरलीडर्स किती मानधन घेतात, हा प्रश्न सगळ्यांना पडला असेल. आज आम्ही आपल्याला चीअरलीडर्स IPL मध्ये किती रुपये कमावतात? त्या कोणत्या देशातून येतात? त्यांचे प्रोफेशन काय? याविषयी माहिती सांगणार आहोत.

चीअरलीडर्सची कशी होते कमाई?
स्फोर्ट्‍स वेबसाइट crunchysports.com नुसार, प्रत्येक चीअरलीडर प्रति लढत 15 ते 25 हजार रुपये मानधन घेते. उल्लेखनिय म्हणजे विजेत्या संघाकडून चीअरलीडर्सला बोनस ‍दिला जातो. संपूर्ण सीजनमध्ये एक टीम किमान 14 सामने खेळते. सगळे सामने मिळून प्रत्येक चीअरलीडर किमान 4 लाख रुपये कमावते.

>प्रति लढत रक्कम: 6-12 हजार रुपये (परफॉर्मनुसार)
>विजेत्या संघाकडून बोनस: 3000 रुपये (फ्रेंचाइझी देते)
>एक्स्ट्रा अपियरेन्स: 7-12 हजार रुपये (पार्टी/इव्हेट)
>फोटो शूट: 5 हजार रुपये (वृत्तपत्र/मॅगझिन)

पुढील स्लाइडवर वाचा, कमाईत टॉपवर आहेत या फ्रेंचाइझीच्या चीयरलीडर्स...