आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

JioFiber देणार दरमहा मोफत 100 जीबी? सोशल मीडियावर व्हायरल होणारा मॅसेज खोटा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोशल मीडियावर पसरवला जाणारा संदेश खोटा... -Jio - Divya Marathi
सोशल मीडियावर पसरवला जाणारा संदेश खोटा... -Jio
गॅजेट डेस्क - सध्या सोशल मीडियावर JioFiber संदर्भातील एक मॅसेज व्हायरल होत आहे. यात Jio ची नवीन सेवा JioFiber सुद्धा सुरुवातीचे 3 महीने मोफत इंटरनेट सेवा देणार असे सांगितले जात आहे. या सेवेवर इंटरनेटची स्पीड तब्बल 100 Mbps राहणार आहे. व्हायरल होणाऱ्या या मॅसेजसंदर्भात आम्ही रिलायंस जियोच्या अधिकाऱ्यांशी संवाद साधला आहे. त्यावेळी या मॅसेजचे तथ्य काही वेगळेच निघाले...
 
- आमच्याशी संवाद साधताना जियोच्या प्रतिनिधींनी सोशल मीडियावर पसरवला जाणारा तो संदेश पूर्णपणे खोटा असल्याचे सांगितले आहे. 3 महिने मोफत सेवा देण्याची कंपनीची कुठलीही योजना नाही. 
- मॅसेजमध्ये लिहिलेली माहिती पूर्णपणे चुकीची असून कंपनीचे लक्ष सध्या केवळ जियोच्या सेवेवर केंद्रीत आहे. 
 
अनेक माध्यमांवर पसरल्या बातम्या
- JioFiber शी संबंधित या कथित सेवेचा अनेक माध्यमांनी बातम्यांमध्ये उल्लेख केला. त्यामुळे, सोशल मीडिया यूझर्सने त्या बातम्या सुद्धा उचलून शेअर केल्या आहेत. 
- माध्यमांनी अशा प्रकारचे वृत्त प्रसारित करताना चक्क JioFiber शी संबंधित प्लॅन सुद्धा सांगितले. तरीही कुठल्याही माध्यमाने ही सेवा कधी सुरू होणार हे सांगितलेले नाही. 
- JioFiber अगदी Jio मोबाईल सिम कार्ड प्रमाणेच आपल्या सर्व सेवा 90 दिवस मोफत देणार असा दावा करण्यात आला होता. 
- दर सेकंद 100 एमबी स्पीडप्रमाणे, महिन्यात 100 जीबी मोफत दिले जाणार असा दावा सुद्धा करण्यात आला होता. 
 
सोशल मीडियावरही जियोने दिले उत्तर
- @iamShakirBaba या ट्वीटर यूझरने @JioCare शी संवाद साधून जियो फाइबर संदर्भात माहिती मागवली होती. 
- यावर कंपनीने जियो फायबर सेवेची प्रिव्हूयू ऑफर मुंबई, दिल्ली-एनसीआर, अहमदाबाद, जामनगर, सुरत आणि बडोदा येथील परिसरांमध्ये लवकरच सुरू होणार अशी माहिती दिली होती. 
- ही सेवा नेमकी कधी सुरू होणार यावर कंपनीने काहीही सांगितलेले नाही. 
- सध्य स्थितीला कंपनी जियो फायबर सेवा सुरू करण्यासाठी विविध प्रकारचे टेस्ट घेत आहे.
 
बातम्या आणखी आहेत...