आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Free Public Wifi Access Zones And Hotspots In India Latest News

तुम्हाला माहीत आहे का? भारतातील या 10 राज्यांत मिळते मोफत Wi-Fi इंटरनेट

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- 'इंटरनेट'विना जगणे जणू अवघड होऊन बसले आहे. स्मार्टफोन युजर्सला एखादा इंटरनेट अॅक्सिस मिळाले नाही तर त्याचा जीव कासावीस होऊन जातो. नोकरदार असो अथवा बिझनसमन, त्याचे इंटरनेटमुळे काम खूप सोपे होते. परंतु, अनेक युजर्स आउटिंगला असताना इंटरनेटचा वापर शक्यतो टाळतात. त्यामागील मुख्य कारण म्हणजे रोमिंग चार्जेज अथवा डाटा जास्त खर्च होणे होय. मात्र, देशातील 10 राज्यांनी स्मार्टफोन युजर्ससाठी मोफत इंटरनेट सुविधा उपलब्ध करून दिली आहे. हे कदाचित आपल्याला माहीत नसेल. देशात कुठे-कुठे मोफत Wi-fi सुविधा उपलब्ध आहे. याविषयी आम्ही आपल्याला पॅकेजमधून माहिती देत आहोत...

राजस्थानमध्ये Free Wi-Fi Zone
मोफत Wi-Fi सुविधा देणारे राजस्थानमधील 'जयपूर' हे देशातील पहिले शहर ठरले आहे. शहरातील सी-स्कीम येथील सेंट्रल पार्कमध्ये सद्यस्थितीत मोफत इंटरनेट सुविधा दिली जात आहे. येथे युजर्सला 2 एमबीपीएसच्या स्पीडने लॅपटॉप, मोबाइल फोन आणि टॅबलेटवर मोफत Wi-fi इंटरनेट वापरता येते. सध्या ही सुविधा फक्त 30 ते 60 मिनिटांच्या कालावधीसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. याशिवाय जयपुरमधील जंतर-मंतर, जवाहर सर्कल आणि गौरव टॉवरमध्ये लवकरच ही सुविधा सुरु करण्यात येणार आहे.

300 ठिकाणी बनेल Free Wi-Fi Zone
जयपुरमधील जवळपास 300 ठिकाणे Free Wi-fi zone म्हणून घोषित करण्‍यात येणार आहे. जयपूरमध्ये सुरु करण्‍यात आलेल्या प्रोजेक्टवर सरकारने जवळपास 10 कोटी रुपये खर्च केले आहेत.

पुढील स्लाइडवर वाचा, देशात आणखी कुठे मिळेल मोफत Wi-fi सुविधा...
(टीप: छायाचित्रांचा वापर फक्त सादरीकरणासाठी करण्‍यात आला आहे.)