आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Free Wifi Zone In Patna Is The World Biggest Wifi Zone

बिहारमध्ये सर्वात मोठे WiFi Zone, येथे दिली जाते मोफत इंटरनेट सुविधा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'बिहार' हा शब्द उच्चारला तरी आपल्‍या डोळ्यासमोर भ्रष्‍टाचार आणि गुन्‍हेगारी येते. गुन्‍हेगारीमुळे बदनाम झालेल्‍या राज्‍यात चांगले काही असेल का? असा प्रश्‍न तुम्‍हाला नक्कीच पडला असेल. याशिवाय या राज्‍याबद्दल अनेक प्रश्‍न तुमच्‍या डोक्‍यात असतील. या सर्व प्रश्‍नांची उकल आज होणार आहे.

बिहार विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. पाच टप्प्यात ही निवडणूक होत आहे. याबद्दल आम्ही बिहार राज्‍याबद्दल असलेले गैरसमज दूर करण्‍याचा प्रयत्‍न करणार आहोत.

माहिती तंत्रज्ञाच्‍या स्‍पर्धेत हे राज्‍य तुसभरही मागे नाही, याची प्रचिती तुम्‍हाला बिहारला गेल्‍यांनतर नक्कीच येईल. बिहारमध्‍ये जगातील सर्वात मोठे वायफाय झोन असून येथे इंटरनेट सेवा मोफत पुरवण्‍यात येते. या झोनची स्‍थापना बिहारची राजधानी पाटणामध्ये करण्‍यात आली आहे.

चीनलाही दिली टक्कर..
पाटणामध्‍ये स्‍थापन करण्‍यात आलेल्‍या जगातील सर्वात मोठ्या वाय-फाय झोनचा कव्हरेज एरिया 20 किलोमीटरचा आहे. अशा प्रकारचे कव्हरेज एरिया असलेले वाय-फाय झोन याआगोदर फक्‍त चीनमध्‍ये होते. चीनच्‍या वाय-फाय झोनची मर्यादा होती 3.5 किलोमिटर.

अशोक राजपथ ते दानापूरपर्यंत मोफत इंटरनेट-
अशोक राजपथ ते दानापूरपर्यंत पटाना शहरात इंटरनेट कनेक्‍शन नसले तरी नेट सुवीधा उपलब्‍ध होते. अशा प्रकारचे इंटरनेट झोन बिहारमध्‍ये असायला हवे ही कल्‍पना मुख्‍यमंत्री नीतिश कुमार यांनी मांडली आणि ती वास्‍तवात आणल्‍यामुळे आज या झोनची जगभर चर्चा केली जात आहे.

पुढील स्‍लाइड्‍डवर पाहा, जगातील सर्वात मोठ्या वायफाय झोनची फोटोज...