नोएडा- #Freedom251 स्मार्टफोन सध्या ट्रेडिंगमध्ये आहे. देशातच नव्हे तर विदेशातही फक्त 251 रुपयांत स्मार्टफोन लॉन्च करणार्या रिंगिंग बेल्स कंपनीची चर्चा आहे. मोहीत गोयल हे कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आहे. त्याची पत्नी धारणा गाेयल या कंपनीच्या सीईओ आहे.
मोहीत यांचे वडील राजेश कुमार यांनी सांगितले, की 'सामान्य लोकांसाठी काही वेगळे करायचे स्वप्न मोहीतने लहानपणीच पाहिले होते.
- नव्या कामात सगळ्यांनाच अडचणी येतात. त्याला मोहीतही अपवाद नाही. मात्र, अडचणी निर्माण करणार्यांना येत्या जूनमध्ये बाजारात येणारा स्मार्टफोनच प्रत्युत्तर देईल, असे राजेश कुमार यांनी सांगितले.
- स्वत:ची कंपनी सुरु करण्यापूर्वी मोहीत वडीलांना बिझनेसमध्ये मदत करत होता. राजेश कुमार यांचे किराणा दुकान आहे.
मोहीत-धारणा यांचा प्रेमविवाह
> रिंगिंग बेल्स कंपनीचे एमडी व मोहित गोयल व सीईओ धारणा गोयल यांनी प्रेमविवाह केला आहे.
>जगातील सर्वात स्वस्त स्मार्टफोन अर्थात Freedom251 ची कल्पना धारणा यांची आहे.
पुढील स्लाइड्सवर पाहा, जगातील सर्वात स्वस्त स्मार्टफोन देणार्या कंपनीच्या ग्लॅमरस CEO धारणा गोयल यांचे फोटोज...