केवळ 50 रुपयांत 'वेबसाइट डिझायनिंग व होस्टिंग'चा बिझनेस सुरु करणारे अभिषेक रुंगटा हे आज 40 कोटींच्या कंपनीचे मालक आहेत. कोलकात्यात राहाणारे अभिषेक रुंगटा यांनी अथक परिश्रमाच्या जोराव उद्योगात उंच शिखर सर केले आहे. आयुष्यात अनेक कठीण संघर्षाचा सामना केल्यानंतर अभिषेक यांनी स्वत:चा वेगळा ठसा उमटवला आहे. कॉमर्समध्ये पदवीचे शिक्षण घेतानाच अभिषेक यांनी आपला बिझनेस सुरु केला होता. आज त्यांची कंपनी परदेशातही आपला बिझनेस करत आहे.
अभिषेक यांनी शिक्षण घेत असतानाच त्यांनी स्वत:ची ई-मेल सर्व्हिस सुरु केली होती. यात त्यांच्या कुटुंबियांचे त्यांना मोलाचे पाठबळ लाभले. सन 1997 मध्ये इंटरनेटचा एक नवा कॉन्सेप्ट होता. ई-मेल सर्व्हिसच्या माध्यमातून बिझनेस व त्यांचे क्लाइंटदरम्यान योग्य कम्युनिकेशन साधण्याचे काम अभिषेक करत होते.
पुढील स्लाइडवर वाचा, पैसा घेवून पळून गेले सर्व्हिस प्रोव्हाइडर