आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Furnitures From Recycled Waste Material Form Jodhpur Couple

या जोडप्याने भंगारातून बनवल्या यूनिक वस्तू, 40 देशांमध्ये कोट्यवधींचा बिझनेस

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जयपूर- राजस्थानच्या एका जोडप्याने टाकावूपासून टिकावू वस्तू बनवून यूनिक बिझनेस सुरु केला आहे. हृतेष व प्रीति लोहिया यांच्या 'प्रीति इंटरनॅशनल' कंपनीत वेस्ट मटेरियलपासून 'यूजफुल' वस्तुंची निर्मिती केली जाते. हृतेष व प्रीतिने चीन, यूएसशिवाय जगभरातील 40 देशांमध्ये आपला बिझनेस विस्तारित केला आहे. कंपनीचा सध्याचा टर्नओव्हर आठ मिलियन डॉलर्स जास्त आहे.

2003 मध्ये सुरु केली कंपनी...
- जोधपूरच्या हृतेष व प्रीति लोहियाने प्रीति इंटरनॅशनल नामक कंपनी 2003 मध्ये सुरु केली होती.
- या दाम्पत्याने अनेक बिझनेसमध्ये नशीब आजमावले परंतु त्यात त्यांना यश आले नाही.
- प्रीति इंटरनॅशनलच्या आज तीन फॅक्टरी असून त्यात 400 पेक्षा जास्त कर्मचारी आहेत.

असे मिळाले यश...
- हृतेषने सांगितले, की 2003 मध्ये त्याने हँडीक्राफ्ट बिझनेस सुरु केला. मात्र, त्यात त्याला प्रचंड नुकसान सोसावे लागले.
- या दरम्यान त्यांना एका केमिकल फॅक्टरीतील काही वेस्ट टीनचे ड्रम मिळाले. दोघांनी ड्रमला खुर्ची व टेबलमध्ये बदलून टाकले.
- एका ग्राहकाला हृतेष व प्रीति लोहियाची यूनिक आयडिया खूप आवडली. त्यानंतर मात्र, हृतेष व प्रीति लोहियांनी रिसायकलिंगचा बिझनेस सुरु केला.

काय काय बनवते कंपनी
प्रीति इंटरनॅशनल कंपनीत वेस्ट मटेरियलपासून हँडबॅगपासून मिलिट्री टेंट व डेनिम पॅंटची निर्मिती करते. इतकेच नव्हे तर वेस्ट टीन, ड्रम, मशीनपासून फर्नीचर तर बाइकच्या वेस्ट हेडलाइटपासून लॅम्पची निर्मिती केली जाते.

येथून आणले जाते वेस्ट मटेरियल
हृतेष व प्रीति यांची कंपनी वेस्ट मटेरियलसाठी स्क्रॅप डीलर्सशी करार करते. याशिवाय इंडियन रेल्वे व आर्मीच्या वेस्ट मटेरियलसाठी लिलावात सहभागी होते. तेथून आवश्यक ते साहित्य खरेदी करण्यात येते.

पुढील स्लाइडवर पाहा, हृतेष व प्रीति लोहिया भंगारातून साकारलेल्या यूजफुल वस्तू...