आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • G 20 Members Launch 'W 20′ Grouping To Empower Women

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

महिला शक्तीतून गतिमान होणार जगाचे अर्थचक्र

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लक्ष्मी पुरी, उपकार्यकारी संचालक, संयुक्त राष्ट्र (महिला) - Divya Marathi
लक्ष्मी पुरी, उपकार्यकारी संचालक, संयुक्त राष्ट्र (महिला)
अंकारा - आर्थिक क्षेत्रातील पुरुषी वर्चस्व कमी करण्यासाठी लिंग समावेशकता येण्यासाठी जी-२० समूहाने आता वुमन्स-२० (डब्ल्यू-२०) गटाची स्थापना केली आहे. जी-२० समूहात असणार्‍या २० देशातील महिला वुमन्स-२० मध्ये प्रतिनिधी राहतील. गुल्डेन तूर्कटॅन यांची वुमन्स-२० च्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. महिला सशक्तीकरणातून जगाच्या अर्थचक्राला गती दिशा देण्याचे काम वुमन्स-२०मुळे होईल.

जी-२० च्या सध्या अंकारा येथे सुरू असलेल्या बैठकीत वुमन्स-२० ची घोषणा करण्यात आली. यावेळी आंतराष्ट्रीय नाणेनिधीच्या एमडी ख्रिस्तिना लॅगार्ड, आर्थिक सहकार्य विकास संस्थेचे (ओईसीडी) महासचिव एंजल गुरीया, संयुक्त राष्ट्राच्या महिला समितीच्या उपकार्यकारी संचालक लक्ष्मी पुरी, आंतरराष्ट्रीय व्यापार केंद्राचे कार्यकारी संचालक अर्चना गोन्झालेझ आदींची उपस्थिती होती. जी-२० मधील सर्व देशांनी लवकरात लवकर महिला सदस्यांची नेमणूक करावी, असे आवाहन यावेळी करण्यात आले. वुमन्स-२० ची पहिली परिषद इस्तंबूल येथे ऑक्टोबर मध्ये होणार आहे.

२००८च्या मंदीत काम
अमेरिकेतूनसुरू झालेल्या २००८ मधील जागतिक मंदीच्या वेळी जी-२० गटाने आर्थिक क्षेत्रात अत्यंत महत्त्वाची कामगिरी बजावली. या मंदीनंतर जी-२० गटाने नऊ वेळा एकत्रित बैठका घेतल्या. त्यातून जगभरात शाश्वत आर्थिक विकास, संतुलित वाढ यासाठी प्रयत्न केले. जोखीम नियंत्रण केले, राेजगार निर्मितीवर भर दिला मंदी पुन्हा येऊ नये यासाठी जागतिक आर्थिक क्षेत्राचा आराखडा आधुनिक केला.

महिलांमुळे २७%नी वाढू शकताे देशाचा जीडीपी
भारतात महिला कामगारांची संख्या पुरुष कामगाराइतकी झाली तर या देशाचे सकल राष्ट्रीय उत्पादन (जीडीपी)२७ टक्क्यांनी वाढू शकते, असे मत आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या प्रमुख ख्रिस्तिना लॅगार्ड यांनी व्यक्त केले. याच प्रमाणे महिला कामगार वाढल्यास अमेरिकेला टक्के तर जपानला टक्के वाढीचा फायदा होऊ शकतो.

चांगला वाव
महिलांचा वुमन्स-२० असा गट निर्माण होणे ही ऐतिहासिक घटना आहे. यामुळे आर्थिक क्षेत्रात महिलांच्या सहभागास चांगला वाव मिळणार आहे. - लक्ष्मी पुरी, उपकार्यकारी संचालक, संयुक्त राष्ट्र (महिला)

वुमन्स-२० चे स्वरूप
- त्या-त्या देशातील उद्योग क्षेत्रातील दिग्गज महिला
- सामाजिक शैक्षणिक संस्थांतील महिला
- राजकीय क्षेत्रातील महिला किंवा महिला मंत्री यांचा समावेश राहील.

जी-२० काय आहे ?
आशियात १९९९ मध्ये आलेल्या मोठ्या आर्थिक संकटानंतर विविध देशातील अर्थमंत्री मध्यवर्ती बँकांचे गव्हर्नर यांच्या बैठकीत जी-२० ची स्थापना झाली. जागतिक आर्थिक विकासात सहकार्य या सूत्राने जगातील विकसित विकसनशील असे २० देश एकत्र येऊन बनलेला हा एक मुख्य गट आहे. जागतिक सकल उत्पादनाचे (जीडीपी) ८५ टक्के प्रतिनिधित्व करणारा हा जी-२० गट आहे.

जी-२० देश
- अर्जेंटिना - ऑस्ट्रेलिया - ब्राझील - कॅनडा - चीन - फ्रान्स - जर्मनी - भारत - इंडोनेशिया - इटली - जपान - मेक्सिको - रशिया - सौदी अरेबिया - दक्षिण अफ्रिका - दक्षिण कोरिया - तूर्कस्तान - इंग्लंड - अमेरिका - युरोपियन युनियन. जी-२० चे अध्यक्षपद फिरते असते, सध्या तुर्कस्तानकडे आहे.