आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nitin Gadkari Said Government Will Spent 11 Thousand Crore To Stop Accident

रस्ते अपघात रोखण्यासाठी ११ हजार कोटींची तरतूद, गडकरींची माहिती

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - रस्ते अपघात थांबवण्यासाठी तसेच रस्त्याचे इन्फ्रास्ट्रक्चर सुधारण्यासाठी सरकार पाच वर्षांत ११,००० कोटी रुपये खर्च करणार असल्याची माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक आणि परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी दिली. दरवर्षी या अशा अपघातांत ६०,००० कोटी रुपयांचे नुकसान होते. देशाच्या जीडीपीचा विचार केल्यास हे सुमारे तीन टक्के असल्याचेही गडकरी यांनी सांगितले.

"रस्ते सुरक्षा सप्ताह' या कार्यक्रमाची सुरुवात झाल्यानंतर नितीन गडकरी पत्रकारांशी संवाद साधला, या वेळी त्यांनी ही माहिती दिली. जगातील सर्वात जास्त रस्ते अपघात होणाऱ्या देशांच्या यादीत भारताचा समावेश असल्याचे त्यांनी सांगितले. आपल्या देशात दरवर्षी रस्ते अपघातांत जितके लोक मरतात, तितके युद्धातदेखील मारले जात नाहीत. त्यामुळे ही एक गंभीर समस्या असल्याचे त्यांनी सांगितले. या बाबत आपल्याला स्वीडनचे अनुकरण करावे लागेल, या देशात गेल्या वर्षी फक्त एकच रस्ता अपघात झाला होता.

रस्ते वाहतूक आणि सुरक्षितता बिल लवकरच संसदेत मंजूर करण्यात येणार असल्याचे गडकरी यांनी सांगितले. रस्ते वाहतुकीसंबंधी नियमांचे उल्लंघन करण्याऱ्यांविरुद्ध कडक कारवाई करण्यासाठी देशातील १२ प्रमुख शहरांत रस्त्यांवर सीसीटीव्ही लावण्यात येणार आहेत. रस्त्यावर एकही कार विनाएअरबॅग नसेल तसेच ट्रकांच्या केबिनमध्ये एअरकंडिशनर आवश्यक केले जाणार आहे.

देशातील सर्व राष्ट्रीय महामार्ग अपघातरहित करण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचे गडकरी यांनी सांगितले. ही स्थिती सुधारण्यासाठी अनेक प्रयत्न करण्यात आले आहेत. अपघातप्रवण क्षेत्र किंवा निश्चित जागेची (स्पॉट) माहिती लोकांनी द्यावी. यासाठी वेबसाइट बनवण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

राजधानी दिल्लीमधील अशा १२८ ठिकाणांची माहिती घेण्यात आल्याचे ते म्हणाले. रस्त्याचे अभियांत्रिकी आणि फ्लायओव्हर-अंडरपासच निर्माण करण्याच्या पद्धतीत सुधारणा करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

सचिन तेंडुलकरनेही राज्यसभेत लक्ष वेधले
राज्यसभेचा सदस्य असलेला सचिन तेंडुलकर याने १४ डिसेंबर २०१५ राेजी राज्यसभेत रस्त्यांवरील अपघात अाणि सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली हाेती. अशा प्रकरणी सीसीटीव्ही फुटेज अाणि वाहन नाेंदणी क्रमांकाविरुद्ध ई-चालानद्वारे वाहतुकीमधील गुन्हे कमी करता येऊ शकतात का? अाणि नवीन प्रस्तावित िवधेयकात याचा समावेश अाहे का? याबाबत िवचारणा केली हाेती. गडकरी यांनीही या बाबी प्रस्तावित असून लवकरच हे िवधेयक संसदेत असल्याचे सचिनला कळविले हाेते.

३०% वाहन परवाने खोटे
देशात ३० टक्के वाहन परवाने बोगस असल्याचे गडकरी यांनी सांगितले. ही बोगसगिरी थांबवण्यासाठी परवाने देण्याची प्रक्रिया ऑनलाइन करण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले.

दरवर्षी पाच लाख अपघात
दरवर्षी सुमारे पाच लाख रस्ते अपघात होतात. यामध्ये दीड लाख लोक मारले जातात आणि तीन लाख लोक दिव्यांग होतात. दिल्लीमध्ये गेल्या वर्षी १,५०० लोक मारले गेले होते. म्हणजेच रोज चार जण मृत्युमुखी पडले होते.