आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Gatiman Express Run Between Hazrat Nizamuddian And Agra Cantt Railway Station

प्लेनच्या धर्तीवर रेल्वेतही होस्टेस, दिल्ली-आग्रा मार्गावर धावणार गतिमान एक्स्प्रेस

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- कल्पना करा की, तुम्ही एखाद्या रेल्वेतून प्रवास करत आहात, मंद संगीत ऐकू येत आहे, एखादी होस्टेस गुलाबपुष्प देऊन तुमचे स्वागत करत आहे, ट्रेन स्वच्छ आणि वेगवान आहे... ही कल्पना आता प्रत्यक्षात साकारणार आहे. रेल्वेने मंगळवारपासून (5 एप्रिल) सुरू होत असलेल्या दिल्ली-आग्रा मार्गावर गतिमान एक्स्प्रेसमध्ये प्रवाशांच्या सेवेसाठी होस्टेस सज्ज करण्याचा निर्णय घेतला आहे.

एक्स्प्रेसचे खास वैशिष्ट्ये...
ही ट्रेन ताशी 160 किलोमीटर वेगाने धावणार असून देशाची ही सर्वात वेगवान रेल्वे ठरणार आहे. रेल्वेमंत्री सुरेश प्रभू पाच एप्रिलरोजी या ट्रेनला हिरवी झेंडी दाखवणार आहेत. रेल्वेमध्ये विमानासारख्या चांगल्या दर्जेदार सुविधा देण्याचा रेल्वेचा प्रयत्न आहे. ही ट्रेन विमानासारखीच गतिमान आहे. ट्रेनमध्ये होस्टेस असतील. तसेच आतील केटरिंग सेवाही विमानाप्रमाणेच दर्जेदार असेल. सूत्रांनुसार गतिमान एक्स्प्रेसमध्ये भारतीय तसेच आशिया खंडातील खाद्यपदार्थ दिले जाणार आहेत. यात गव्हाचा उपमा, मिनी दोसा, कांजीवरम इडली, ताजी फळे, स्विस रोलसह आलू कुलचा, रोस्टेड ड्रायफूड्स, चिकन रोल आदी पदार्थ सर्व्ह केले जातील. चिकन सॉससह स्पॅनिश एग्ज ऑम्लेट, अक्रोड स्लाइस केक, इतर पेय दिले जातील.

शताब्दीपेक्षा एक पाऊल पुढे
सध्याची सर्वात वेगवान रेल्वे शताब्दी एक्स्प्रेस असून ती आग्रा - दिल्ली हे 200 किलोमीटरचे अंतर 120 मिनिटांत पूर्ण करते. तर गतिमान एक्स्प्रेस हेच अंतर 105 मिनिटांत पूर्ण करणार आहे. गतिमान एक्स्प्रेसचे भाडे शताब्दीपेक्षा 25 टक्क्यांनी जास्त असणार आहे. गतिमान एक्स्प्रेसचा चेअर कार एसीचे भाडे 690 रुपये असेल.

तर एक्झिक्युटिव्ह क्लासचे भाडे प्रति प्रवाशी 1365 रुपये इतके असेल. दिल्ली - आग्रा दरम्यान शताब्दीच्या चेअर कारचे भाडे 540 रुपये आहे एक्झिक्युटिव्ह क्लासचे भाडे 1040 रुपये आहे.

पुढील स्लाइडवर पाहा, अशी असेल गतिमान ए‍क्स्प्रेस...